रजनीकांत यांच्या 'जेलर'मधला तमन्ना भाटियाचा किलर लूक आला समोर, चाहत्यांची वाढली उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 05:39 PM2023-01-20T17:39:29+5:302023-01-20T17:40:27+5:30

Tamannaah Bhatia : दिग्दर्शक मधुर भांडारकरच्या 'बबली बाऊंसर' या चित्रपटात दबंग शैलीतील भूमिकेत झळकलेली तमन्ना आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tamannaah Bhatia's killer look in Rajinikanth's 'Jailor' came out, fans are curious | रजनीकांत यांच्या 'जेलर'मधला तमन्ना भाटियाचा किलर लूक आला समोर, चाहत्यांची वाढली उत्सुकता

रजनीकांत यांच्या 'जेलर'मधला तमन्ना भाटियाचा किलर लूक आला समोर, चाहत्यांची वाढली उत्सुकता

googlenewsNext

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक मधुर भांडारकर(Madhur Bhandarkar)च्या 'बबली बाऊंसर' (Bably Bauncer) या चित्रपटात दबंग शैलीतील भूमिकेत झळकलेली तमन्ना (Tamannaah Bhatia) आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तमन्ना एका दमदार भूमिकेत आपल्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. लवकरच 'जेलर' या आगामी चित्रपटात ती दिसणार आहे. 'जेलर' चित्रपटातील आपला किलर लुक नुकताच तमन्नानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या लुकसोबतच तिने इतर कलाकारांच्या लुक्सचेही फोटो शेअर केले आहेत.

तमन्ना भाटियाने इंस्टाग्रामवर जेलर चित्रपटातील कलाकारांचे लूक शेअर करत लिहिले की, 'अखेर हे मी सर्वांसोबत शेअर करु शकले. या निमित्ताने वन अँड ओन्ली थलायवा रजनीकांत आणि दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांच्या 'जेलर' चित्रपटाचा भाग बनल्याचा खूप आनंद आहे.' 


अभिनेत्रीच्या या घोषणेनंतर तिचे चाहते तिचे सोशल मीडियावर अभिनंदन करत आहेत. तमन्ना भाटियाच्या कारकिर्दीतील हा एक मोठा प्रोजेक्ट आहे आणि 'जेलर' हा रजनीकांतचा कमबॅक चित्रपट तसेच त्यांचा १६९वा चित्रपट आहे. या चित्रपटात तिच्यासोबत मोहनलाल, शिवराज कुमार, सुनील हे कलाकारही दिसणार आहेत. तमन्नाप्रमाणेच 'जेलर'मध्ये रजनीकांत यांचा काहीसा हटके अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

तमन्ना भाटिया सध्या अभिनेता विजय वर्मासोबतच्या तिच्या नात्याच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहे. गोव्यातील नवीन वर्षाच्या कार्यक्रमात दोघे एकमेकांना किस करताना दिसले होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, या दोन्ही स्टार्सनी त्यांच्या अफेअरच्या वृत्ताच्या चर्चेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Web Title: Tamannaah Bhatia's killer look in Rajinikanth's 'Jailor' came out, fans are curious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.