आलियासोबत दिसणे का टाळतोयं सिद्धार्थ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 16:07 IST2016-07-15T10:37:30+5:302016-07-15T16:07:30+5:30
आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा या दोघांमध्ये सध्या काय चाललयं, हे ठाऊक नाही. कालच सिद्धार्थ आणि आलिया एअरपोर्टवर दिसले. ...
.jpg)
आलियासोबत दिसणे का टाळतोयं सिद्धार्थ?
आ िया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा या दोघांमध्ये सध्या काय चाललयं, हे ठाऊक नाही. कालच सिद्धार्थ आणि आलिया एअरपोर्टवर दिसले. मात्र यादरम्यान फोटोग्राफर्सला एकत्र पोझ मिळू नये,यासाठी आलिया व सिद्धार्थ दोघेही आटोकाट प्रयत्न करताना दिसले. यामागचे कारण म्हणजे पब्लिकमध्येआलियासोबत एकत्र पोझ न देण्यास निर्णय सिद्धार्थने घेतला आहे. होय, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सिद्धार्थने आपल्या मॅनेजरला याबाबत कडक शब्दात आदेश दिला होत. आलियाचा आणि त्याचा एअरपोर्टवरील एकही फोटो बाहेर पडता कामा नये, असे मॅनेजरला त्याने बजावले होते. अर्थात तसे काहीही झाले नाही. शेवटी आलिया व सिडचे फोटो मीडियापर्यंत पोहोचले. यामुळे सिद्धार्थ म्हणे प्रचंड नाराज झालायं. आता आलियासोबत पोझ द्यायला सिद्धार्थचा नकार का देतोय, यामागचे नेमके कारण काय, हे कळायला मार्ग नाही. कदाचित सिद्धार्थने आपल्या लव्ह लाईफपेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित त्याचमुळे आलियासोबतचे नाते तो लपवू पाहतो आहे. अलीकडे तो व आलिया लंडनला हॉली डे एन्जॉय करून आलेत. पण सिद्धार्थने शेवटपर्यंत ही गोष्ट या कानाची त्या कानाला कळू दिली नाही. पण ऐनकेनप्रकारे ही बातमी मीडियापर्यंत पोहोचली. असो, शेवटी निर्णय सिद्धार्थचा आहे. पण लपवल्याने काहीही लपत नाही, हे मात्र खरे!
![]()