तैमुरला अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात करायचंय करिअर, सैफ अली खानने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 13:19 IST2024-02-09T13:17:22+5:302024-02-09T13:19:25+5:30

तैमुरला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचंय याबद्दल सैफ अली खानने मोठा खुलासा केलाय

Taimur wants to pursue a career in football field revealed Saif Ali Khan | तैमुरला अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात करायचंय करिअर, सैफ अली खानने केला खुलासा

तैमुरला अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात करायचंय करिअर, सैफ अली खानने केला खुलासा

सैफ अली खान (Saif Ali Khan) हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. सैफने आजवर विविध सिनेमांमधून लोकांच्या मनात घर केलं. 'ओमकारा' असो वा 'लव्ह आज कल', सैफच्या विविधरंगी भूमिका कायम चाहत्यांच्या लक्षात राहिल्या आहेत. सैफ त्याच्या कुटुंबाबद्दल सोशल मीडियावर कायम भाष्य करत असतो. सैफने तैमुरच्या भविष्याबद्दल एका मुलाखतीत खुलासा केलाय. तैमुरला (Taimur) अभिनय नाही तर वेगळ्या क्षेत्रात करिअर करायचंय, असा खुलासा सैफने केलाय.

सैफने तैमुरच्या भविष्याबद्दल मोठा खुलासा केलाय. सैफ म्हणाला, तैमुरला बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर राहण्याची इच्छा आहे. तैमुरला एक फुटबॉलपटू किंवा गिटार वादक बनायची इच्छा आहे. याशिवाय फुटबॉलचं प्रशिक्षण घेण्यासाठी तैमुरला अर्जेंटिनाला जायची इच्छा आहे, असाही सैफने खुलासा केलाय. अशाप्रकारे तैमुर भविष्यात फुटबॉलपटू झाला तर आश्चर्य वाटायला नको.

सैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर... २०२३ मध्ये 'आदिपुरुष' सिनेमात सैफने लंकेश रावणाची भूमिका साकारली. या सिनेमावर आणि सैफच्या लूकवर प्रचंड प्रमाणात टीका झाली. याशिवाय सैफ आगामी 'देवरा' सिनेमातून लोकांच्या भेटीला येणार आहे. सैफसोबत या सिनेमात ज्युनियर एनटीआर झळकणार आहे. हा सिनेमा ५ एप्रिल २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Taimur wants to pursue a career in football field revealed Saif Ali Khan