‘या’ अभिनेत्यामुळे तब्बू आजही आहे सिंगल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2017 10:23 IST2017-06-29T04:53:02+5:302017-06-29T10:23:02+5:30
तब्बू या प्रतिभावान अभिनेत्रीची क्रेझ अद्यापही कायम आहे. ८०-९० च्या दशकात तब्बूच्या अनेक चित्रपटांनी पे्रक्षकांची मने जिंकलीत. १९८० मध्ये ...

‘या’ अभिनेत्यामुळे तब्बू आजही आहे सिंगल!
त ्बू या प्रतिभावान अभिनेत्रीची क्रेझ अद्यापही कायम आहे. ८०-९० च्या दशकात तब्बूच्या अनेक चित्रपटांनी पे्रक्षकांची मने जिंकलीत. १९८० मध्ये आलेल्या ‘बाजार’ चित्रपटात तब्बू अतिथी भूमिकेत दिसली. यानंतर तिने बॉलिवूडचे अनेक सिनेमे केले. मात्र १९९४ मध्ये तब्बूच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. होय, यावर्षी ती अजय देवगणसोबत ‘विजयपथ’मध्ये दिसली. तब्बू व अजयची या चित्रपटातील जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. हा चित्रपट हिट झाला. आम्हाला अजयची आठवण व्हावी, कारण तब्बूची बातमी त्याच्याशीच संबंधित आहे.
तब्बू आजही अविवाहित आहे. आजपर्यंत तब्बूचे नाव कुणासोबतही जोडले गेले नाही. पण तब्बू सिंगल असण्यामागचे कारण केवळ आणि केवळ अजय देवगण आहे, असे मानले जाते. पण आता खुद्द तब्बूनेच यावर मोहर लावली आहे.
![]()
होय, अलीकडे एका मुलाखतीत तब्बू या विषयावर बोलली. अजय व मी आम्ही गेल्या २५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. अजय हा माझा कझिन समीर आर्याचा शेजारी आहे आणि माझा खूप चांगला मित्र आहे. मी माझे करिअर सुरू केले, तेव्हापासून अजय माझ्यासोबत आहे. त्या काळात समीर व अजय दोघेही माझे डोळ्यात तेल घालून रक्षण करासचे. मला प्रत्येकठिकाणी फॉलो करायचे. माझ्यासोबत एखादा मुलगा बोलला रे बोलला की, हे दोघेही त्याला धमकावणार, हे ठरलेलेच होते. दोघेही प्रचंड उनाड होते. आज मी सिंगल आहे, ते त्याचे कारण केवळ अजय आहे. आशा करते, त्याला आता पश्चाताप होत असावा की, त्याने हे काय केले, असे तब्बू म्हणाली.
तब्बू व अजयने ‘हकीकत’,‘तक्षक’,‘फितूर’ आणि ‘दृश्यम’ सारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. लवकरच हे दोघे ‘गोलमाल4’मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात अर्शद वारसी, परिणीती चोप्रा, कुणाल खेमू आणि तुषार कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.