तापसी पन्नू म्हणते, पुरस्कार वगैरे माझ्या पत्रिकेतच नाहीत!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 13:11 IST2019-04-08T13:10:51+5:302019-04-08T13:11:31+5:30

तापसी पन्नू बॉलिवूडची गुणी अभिनेत्री आहे. गत काही वर्षांत तापसीने एकापेक्षा एक दमदार चित्रपट दिलेत. या चित्रपटातील तापसीच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले. समीक्षकांनीही तापसीला दाद दिली. पण या कौतुकाची परिणीती पुरस्कारात होताना मात्र दिसली नाही.

taapsee pannu is unhappy with not getting award | तापसी पन्नू म्हणते, पुरस्कार वगैरे माझ्या पत्रिकेतच नाहीत!!

तापसी पन्नू म्हणते, पुरस्कार वगैरे माझ्या पत्रिकेतच नाहीत!!

ठळक मुद्देलवकरच तापसी अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘सांड की आंख’ या चित्रपटात दिसणार आहे.

तापसी पन्नू बॉलिवूडची गुणी अभिनेत्री आहे. गत काही वर्षांत तापसीने एकापेक्षा एक दमदार चित्रपट दिलेत. या चित्रपटातील तापसीच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले. समीक्षकांनीही तापसीला दाद दिली. पण या कौतुकाची परिणीती पुरस्कारात होताना मात्र दिसली नाही. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिल्यानंतरही गत दोन वर्षांत कुठल्याही पुरस्कारावर तापसीचे नाव कोरले गेले नाही. कुठल्याही श्रेणीत तिला साधे नामांकनही मिळाले नाही. अलीकडे तापसी याबद्दल बोलली.


पुरस्कार मिळो, ना मिळो मी त्याची मुळीच पर्वा करत नाही. कदाचित पुरस्कार वगैरे माझ्या नशीबात नाही. दोन वर्षांपूर्वी माझा ‘पिंक’ चित्रपट रिलीज झाला, तेव्हा इंडस्ट्रीत मी अगदी नवखी होते. कदाचित म्हणून मी पुरस्कारासाठी पात्र नाही, असे मला वाटले होते. नवी असल्याने मला पुरस्कार मिळाला नाही, असे मी स्वत:च स्वत:चे समाधान करून घेतले होते. यानंतर मी अनेक हिट चित्रपट दिलेत. प्रचंड मेहनत केली. पण पुरस्कार मिळाला नाही. कदाचित पुरस्कार माझ्या कुंडलीत नाही, असे आता मला वाटते. अर्थात यामुळे माझा कुणावरही राग वगैरे नाही, असे तापसी म्हणाली.


लवकरच तापसी अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘सांड की आंख’ या चित्रपटात दिसणार आहे. यात भूमी पेडणेकर ही सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा दोन शार्पशूटर महिलांवर आधारित आहे. यापूर्वी तापसीचा ‘बदला’ चित्रपट रिलीज झाला होता. सुजोय घोष दिग्दर्शित हा चित्रपट सुपरडुपर हिट राहिला. मर्डर मिस्ट्रीवर आधारित असलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी वकीलाची भूमिका साकारली होती.

Web Title: taapsee pannu is unhappy with not getting award