"राजकुमारासारखा जोडीदार भेटण्यापूर्वी अनेक बेडकांना...", रिलेशनशिपबाबत हे काय बोलून गेली तापसी पन्नू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 11:19 IST2024-03-12T11:15:09+5:302024-03-12T11:19:14+5:30

"एका मुलाबरोबर नाही तर पुरुषाबरोबर राहायचं आहे", बॉयफ्रेंडबाबत तापसी पन्नूचं स्पष्ट वक्तव्य

taapsee pannu talk about realtionship with bf said i kissed many frogs before found my prince | "राजकुमारासारखा जोडीदार भेटण्यापूर्वी अनेक बेडकांना...", रिलेशनशिपबाबत हे काय बोलून गेली तापसी पन्नू?

"राजकुमारासारखा जोडीदार भेटण्यापूर्वी अनेक बेडकांना...", रिलेशनशिपबाबत हे काय बोलून गेली तापसी पन्नू?

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तापसी बॉयफ्रेंड मथियास बोई याच्याशी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मार्च महिन्यात तापसी लग्न करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. पण, लग्नाबाबत अद्याप तापसीने कोणतीही माहिती दिलेली नाही. तापसीने आता बॉयफ्रेंड मथियासबरोबरच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलं आहे. 

'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत तापसी म्हणाली, "राजकुमाराला भेटण्याआधी मी अनेक बेडकांना किस केलं आहे. पण, जेव्हा मी मोठी झाले आणि काम करायला सुरुवात केली. तेव्हापासून हा व्यक्ती आहे. कारण, तो मुलगा नसून पुरुष आहे. एका पुरुषाबरोबरच मला सुरक्षित वाटू शकतं, हे मला माहीत आहे. आमच्यात भावनिक नातं आहे. त्यामुळे याचा परिणाम फक्त माझ्यावरच नाही तर माझं कुटुंब आणि कामावरही होईल. मी माझ्या कामाशी आणि मानसिक स्थितीशी खेळू शकत नाही. म्हणून, एका मुलाबरोबर नाही तर मला पुरुषाबरोबर राहायचं आहे."

लग्नाच्या चर्चांवरही तापसीने या मुलाखतीत भाष्य केलं. "कोणालाही त्याच्या आयुष्याबाबत असं विचारणं चुकीचं आहे. जेव्हा मला या गोष्टीची घोषणा करायची असेल, तेव्हाच मी त्याबद्दल बोलेन. तुम्ही याबद्दल बोलला नाहीत तर मला याबद्दल विचार करण्यास वेळ मिळेल. तेव्हाच मी या सर्व गोष्टींबद्दल बोलेन. मी काही बेकायदेशीर करत आहे, असंही नाही. तुम्ही माझ्याकडून लग्नाची अपेक्षा केली नव्हती का? मी माझ्या नात्याबद्दल खूप इमानदार आहे. मी ते लपवलं देखील नाहीये. त्यामुळे जेव्हा हे घडेल, तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल," असंही तापसी म्हणाली.  तापसी गेल्या १० वर्षांपासून मथियास बोईबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. 

Web Title: taapsee pannu talk about realtionship with bf said i kissed many frogs before found my prince