तापसी पन्नूने फ्लॉन्ट केले तिचे सिक्स पॅक अ‍ॅब्स, हैराण झाले नेटकरी; म्हणाले- ही तर....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 02:42 PM2023-04-10T14:42:39+5:302023-04-10T14:54:31+5:30

अलिकडेच तापसीने तिच्या जिम ट्रेनसोबतचा सिक्स पॅक अ‍ॅब्स फ्लॉन्ट करतानाचा फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा फोटो जोरदार व्हायरल झालाय.

Taapsee pannu flaunts her 6 pack abs shares photo with gym trainer goes viral | तापसी पन्नूने फ्लॉन्ट केले तिचे सिक्स पॅक अ‍ॅब्स, हैराण झाले नेटकरी; म्हणाले- ही तर....

तापसी पन्नूने फ्लॉन्ट केले तिचे सिक्स पॅक अ‍ॅब्स, हैराण झाले नेटकरी; म्हणाले- ही तर....

googlenewsNext

तापसी पन्नू. ती बोलते रोखठोक. दिसतेही एकदम वेगळी. फिल्मी सौंदर्याचे मापदंड, वागण्याच्या कचकडी पद्धती तिने बाजूला ठेवल्या आणि चारचौघींसारखी ती जगते, बेधडक बोलते आणि आपल्याला आवडतील तेच सिनेमे करते. म्हणून तापसी वेगळी दिसते. अलिकडेच तापसीने तिच्या जिम ट्रेनसोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. 

फोटोमध्ये अभिनेत्री तिचे सिक्स पॅक अ‍ॅब्स फ्लॉन्ट करताना दिसत आहे. आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्तिरेखेत जीव ओतण्यासाठी कठोर परिश्रम घेणाऱ्या तापसीच्या फिझिकल ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती आपल्या ट्रेनरसोबत दिसते. फोटोंसोबत तिने लिहिलंय की, कित्येक महिन्यांचे कठोर परिश्रम केवळ अशाप्रकारच्या अ‍ॅब्ससाठी... आता छोले भटूरे खायला जाणार आहे. तापसीचे फोटो आणि पोस्टवर नेटकरी भरभरून व्यक्त होत आहेत.

नेटकऱ्यांना तापसीचा हा फोटो पाहून टायगर श्रॉफची आठवण झाली आहे. अनेकांनी तिची तुलना टायगर श्रॉफशी केली आहे. तुला टायगर श्रॉफला टक्कर द्यायची आहे का असा प्रश्न तिला यूजर्सनी विचारला आहे. तर अभिनेत्री हुमा कुरेशीने या फोटावर 'गजब' असं लिहित तापसीचा उत्साह वाढवला आहे.


वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तापसी पन्नू शेवटची ZEE5 वर प्रदर्शित झालेल्या ब्लर चित्रपटात दिसली होती. यात गुलशन देवय्याने त्याच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्याचवेळी, आता ही अभिनेत्री राजकुमार हिरानीच्या डंकीमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच किंग खानसोबत काम करणार आहे. याशिवाय 'फिर आयी हसीन दिलरुबा' हा चित्रपटही त्याच्याकडे आहे.
 

Web Title: Taapsee pannu flaunts her 6 pack abs shares photo with gym trainer goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.