बॉलिवूडच्या किंग खानची व्हॅनिटी व्हॅन पाहून स्वरा झाली अचंबित, काय म्हणाली वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 06:00 IST2019-08-11T06:00:00+5:302019-08-11T06:00:00+5:30
किंग खानच्या व्हॅनिटी व्हॅनमुळे आर्श्चयचकीत झालेली आणि या व्हॅनच्या प्रेमात पडलेली अनेक मंडळी आहेत.

बॉलिवूडच्या किंग खानची व्हॅनिटी व्हॅन पाहून स्वरा झाली अचंबित, काय म्हणाली वाचा!
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खान याचं घरच नाही तर व्हॅनिटी व्हॅननं देखील सगळ्यांनाच भुरळ पाडली आहे. किंग खानच्या व्हॅनिटी व्हॅनमुळे आर्श्चयचकीत झालेली आणि या व्हॅनच्या प्रेमात पडलेली अनेक मंडळी आहेत. त्यात आता वीरे दी वेडिंगची स्टार स्वरा भास्करचाही समावेश झाला आहे. in.com वरील अॅमेझॉन ब्युटी प्रेझेंट्स वॅनिटी डायरीज या कार्यक्रमाच्या चौथ्या एपिसोडमध्ये सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट लेखा गुप्तासोबत गप्पा मारताना स्वराने बीटाऊनच्या काही प्रसिद्ध सेलिब्रिटीजबद्दलची गुपितं सांगितली.
कोणाची व्हॅनिटी व्हॅन सगळ्यात छान आहे या प्रश्नावर स्वरा क्षणाचाही विलंब न लावता म्हणाली, "नक्कीच शाहरुख खान सरांची. त्यांची व्हॅनिटी भलीमोठी आणि फार सुंदर आहे. त्यांना बातम्या बघण्याची सवय आहे. ते सतत स्वत:ला अपडेटेड ठेवतात. व्हॅनमध्ये बसून गप्पा मारण्यासाठी त्यांच्या इतका मजेशीर माणूस नाही." तिने पुढे सांगितले की, त्यांच्या व्हॅनमधील बाथरूम इतकं मोठं आहे की आपल्याला तो वन बीएचकेचा फ्लॅटच वाटेल. स्वत:च्या व्हॅनिटी व्हॅनबद्दल बोलताना ती म्हणाली की, त्यात कोणत्याही मेकअपच्या सामानापेक्षा अधिक संख्येने कचऱ्याचे डबे आहे. व्हॅन अत्यंत स्वच्छ असावी, हा तिचा आग्रह असतो.
आपल्या या नव्या पाहुण्याविषयी लेखा म्हणाल्या, "स्वरा अत्यंत उत्साही, प्रामाणिक आणि कोणताही गर्व नसलेली व्यक्ती आहे. या बहुआयामी अभिनेत्रीमध्ये प्रचंड ऊर्जा आहे. त्यामुळे तिच्यासोबत काम करताना आपल्यालाही छान वाटते. तिच्यासोबत हा एपिसोड करताना फारच मजा आली. कारण, ती पडद्यामागेही फार छान असते."
स्वराच्या व्यक्तिमत्त्वाची आजवर फारशी कोणाला माहीत नसलेली बाजून आता अॅमेझॉन ब्युटी प्रेझेंट्स व्हॅनिटी डायरीज या कार्यक्रामच्या आगामी भागातून प्रकाशझोतात येणार आहे.
आवडत्या सेलिब्रिटीजच्या व्हॅनिटी व्हॅन्समध्ये डोकावून पाहत त्यांचे आयुष्य जाणून घेण्यासाठी in.com ट्यून करा.