दिल्लीत नायब राज्यपालांचे अधिकार वाढले! संसदेत विधेयक मंजूर होताच भडकली स्वरा भास्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 15:53 IST2021-03-25T15:52:59+5:302021-03-25T15:53:30+5:30
दिल्लीच्या नायब राज्यपालांचा अधिकार वाढवणारे विधेयक बुधवारी राज्यसभेतही मंजूर झाले. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने यावर उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीत नायब राज्यपालांचे अधिकार वाढले! संसदेत विधेयक मंजूर होताच भडकली स्वरा भास्कर
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे नायब राज्यपाल यांच्या दीर्घकाळापासून संघर्ष सुरु आहे. यादरम्यान दिल्लीतील ‘सरकार’ म्हणजे ‘नायब राज्यपाल’ हे स्पष्ट करणारे आणि दिल्लीच्या नायब राज्यपालांचा अधिकार वाढवणारे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार (सुधारणा) विधेयक बुधवारी राज्यसभेतही मंजूर झाले. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने यावर उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे. यावरचे तिचे ट्वीट सध्या चांगलेच चर्चेत आहे.
आपल्या ट्वीटमध्ये स्वराने लोकनियुक्त म्हणजेच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला पाठींबा दिला आहे. ‘मी नायब राज्यपाल अनिल बैजल यांना मत दिलेले नाही,’ असे लिहित तिने केजरीवाल सरकारला पाठींबा दर्शवला आहे.
आपल्या परखड स्वभावासाठी ओळखल्या जाणा-या स्वराचे हे ट्वीट सध्या चांगलेच चर्चेत आहे. दोन तासांत 1700 पेक्षा अधिक लोकांनी तिचे हे ट्वीट रिट्वीट केले आहे. तर 15 हजारांवर लोकांनी हे ट्वीट लाईक केले आहे.
राज्यसभेत ठउळ अू३ (सुधारीत) २०२१ मंजूर झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीसाठी आजचा दिवस अतिशय दु:खद आहे. पण आम्ही जनतेची ताकद बहाल करण्यासाठी आपला संघर्ष सुरू ठेवू. कितीही अडचणी आल्या तरी आम्ही आमचे काम सुरूच ठेवू. काम ना थांबणार आणि ना संथ होणार, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.