स्वरा भास्करच्या घरी चिमुकलीचं आगमन, पहिला फोटो आणि नाव दोन्ही केलं शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 19:44 IST2023-09-25T19:42:32+5:302023-09-25T19:44:52+5:30
फहाद अहमद बाबा झाला असून स्वराने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Swara Bhaskar
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झाले आहे. फहाद अहमद बाबा झाला असून स्वराने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर स्वराने एक फोटो शेअर केला. त्यांनी चाहत्यांना मुलीची झलक तर दाखवलीच पण तिचं नावही सांगितलं. तिच्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
स्वरा भास्करने इन्स्टाग्रामवर चिमुकलीसोबतचे काही फोटो शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये म्हटले की, "प्रार्थना ऐकली गेली, एक आशीर्वाद मिळाला, एक गाण वाजलं, एक गूढ सत्य...आमची मुलगी राबिया हिचा जन्म २३ सप्टेंबर २०२३ रोजी झाला. कृतज्ञ आणि आनंदी अंतःकरणाने प्रेमाबद्दल तुमचे आभार! आमचं एक नवीन जग तयार झालं". लहानग्या पाहुणीच्या आगमाने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. तिच्या या पोस्टवर सेलिब्रेटी आणि चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केलाय.
काही दिवासांपुर्वीच स्वाराने आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. स्वराने गरोदरपणातील काळ एन्जॉय केला. सोशल मीडियावरुन तीने गरोदरपणातील अनेक फोटो शेअर केले होते. शिवाय, तिनं मॅटर्निटी फोटोशूटही केलं होतं. स्वरा भास्करने ६ जानेवारीला समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदबरोबर कोर्ट मॅरेज केलं होतं. फेब्रुवारी महिन्यात स्वराने फहादबरोबरचा व्हिडीओ पोस्ट करत लग्न केल्याची गूडन्यूज चाहत्यांना दिली होती. स्वराच्या या पोस्टमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.