स्वरा भास्करने शाहरूख खानसोबत काम करण्यास दिला नकार, जाणून घ्या त्यामागचे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 21:45 IST2017-03-03T16:15:56+5:302017-03-03T21:45:56+5:30

काही दिवसांपूर्वीच एका इव्हेंटमध्ये मला शाहरूख खानसारखे बनायचे आहे, असे जाहीरपणे सांगणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिने शाहरूखसोबत सिनेमात काम ...

Swara Bhaskar refuses to work with Shah Rukh Khan, the reason behind this! | स्वरा भास्करने शाहरूख खानसोबत काम करण्यास दिला नकार, जाणून घ्या त्यामागचे कारण!

स्वरा भास्करने शाहरूख खानसोबत काम करण्यास दिला नकार, जाणून घ्या त्यामागचे कारण!

ही दिवसांपूर्वीच एका इव्हेंटमध्ये मला शाहरूख खानसारखे बनायचे आहे, असे जाहीरपणे सांगणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिने शाहरूखसोबत सिनेमात काम करण्यास सपशेल नकार दिला आहे. मात्र त्यामागचे नेमके कारण काय हे जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र स्वराचा हा निर्णय काहीसा योग्य तर नाही ना, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. वास्तविक स्वराला आनंद एल. राय यांच्या आगामी सिनेमात शाहरूखच्या आईची भूमिका साकारण्यासाठी तिला आॅफर दिली होती. 

एका न्यूज एजंसीने दिलेल्या माहितीनुसार, स्वरानेच दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या या सिनेमात काम करण्याची संधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. कारण तिला शाहरूखसोबत काम करायचे होते. ती आनंद एल. राय यांना अ‍ॅप्रोचही झाली होती. तसेच त्यांना शाहरूखची बहीण किंवा त्याच्या मुलीची भूमिका साकारण्यास तयार असल्याचेही स्पष्ट केले होते, परंतु आनंद एल. राय यांनी तिला शाहरूखच्या आईची भूमिका आॅफर केली. जेव्हा ही बाब स्वराला कळाली तेव्हा तिला धक्काच बसला. तिने क्षणाचाही विलंब न करता यास नकार दिला. 



आनंद एल. राय यांच्या या आगामी सिनेमात शाहरूख एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. याबाबतची माहिती खुद्द शाहरूखनेच ट्विटरवरून दिली होती. हा एक रोमॅण्टिक सिनेमा असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्यावर्षीच आनंद राय यांनी सिनेमाच्या कथेविषयी मी सांगणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या सिनेमाविषयीची अधिक माहिती समोर येऊ शकली नाही. 

काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत स्वराने मला शाहरूखसारखे बनायचे आहे. त्याच्यासारखे प्रसिद्ध व्हायचे असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र जेव्हा त्याच्यासोबत काम करण्याची संधी आली तेव्हा भूमिकेमुळे स्वराला माघार घ्यावी लागली. आता पुन्हा तिला ही संधी केव्हा मिळणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 

Web Title: Swara Bhaskar refuses to work with Shah Rukh Khan, the reason behind this!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.