Swara Bhasker : काय सांगता? मेहंदी, हळद सगळं झालं, पण स्वरा भास्कर व फहाद अहमदने लग्नचं केलं नाही...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 10:42 IST2023-03-14T10:41:44+5:302023-03-14T10:42:13+5:30

Swara Bhasker : गेल्या दोन दिवसांपासून स्वराच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली होती. तिने हळद, मेहंदी व संगीत पार्टीचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. पण लग्नाच्या विधीचा एकही फोटो स्वराने शेअर केलेला नाही. असं का?

swara bhaskar fahad ahmad have decided to not have a hindu wedding or nikah | Swara Bhasker : काय सांगता? मेहंदी, हळद सगळं झालं, पण स्वरा भास्कर व फहाद अहमदने लग्नचं केलं नाही...?

Swara Bhasker : काय सांगता? मेहंदी, हळद सगळं झालं, पण स्वरा भास्कर व फहाद अहमदने लग्नचं केलं नाही...?

Swara Bhasker Fahad Ahmad : अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या लग्नामुळे चर्चेत आहे. होय, गेल्या जानेवारी महिन्यात स्वराने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी कोर्ट मॅरेज केलं होतं. यानंतर १६ फेब्रुवारी रोजी स्वराने व्हिडीओ शेअर करत लग्नाची माहिती देत, सर्वांना आर्श्चयाचा धक्का दिला होता. त्याच दिवशी दोघांनी एंगेजमेंट केली होती. आता गेल्या दोन दिवसांपासून स्वराच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली होती. तिने हळद, मेहंदी व संगीत पार्टीचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.  पण लग्नाच्या विधीचा एकही फोटो स्वराने शेअर केलेला नाही. असं का तर मेहंदी, हळद, संगीत असं सगळं झालं, पण स्वरा भास्कर आणि फहाद अहमदने लग्नच केलं नाही.

होय, अनेक मीडिया रिपोर्टनी केलेल्या दाव्यानुसार, स्वरा व फहाद यांनी हिंदू वा मुस्लिम कोणत्याही पद्धतीने लग्न केलं नाही. म्हणजेच लग्नाचे पारंपरिक विधी झाले नाहीत. एका रिपोर्टनुसार, दोघांनी केवळ हळद, मेहंदी, संगीत व रिसेप्शन हवं होतं. मात्र  हिंदू वा मुस्लिम अशा कुठल्याही पद्धतीचं लग्न त्यांना नको होतं. त्यामुळे ना हिंदू पद्धतीने लग्न झालं, ना निकाह झाला.  ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार,  स्वरा व फहादने कोणत्याही विशिष्ट पद्धतीने लग्न केलं नाही. दोघांनी हळदी, मेहंदी, संगीत आणि रिसेप्शन यांसारखे सेरेमनी आयोजित केले होते. मात्र त्यांचा हिंदू विवाह किंवा मुस्लीम पद्धतीने निकाह होणार नाही. 
अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर हे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती साऊथ इंडियन ब्राईडल लुकमध्ये दिसते आहे.  

आता रिसेप्शन...
फहाद व स्वराने कोर्ट मॅरेज केलं आहे. हिंदू वा मुस्लिम पद्धतीने लग्न करण्याचा त्यांचा विचार नाही. त्यामुळे त्यांनी लग्नाचे विधी टाळले. आता त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन १६ मार्च रोजी दिल्लीत होणार असल्याचं कळतंय. स्वराने अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Web Title: swara bhaskar fahad ahmad have decided to not have a hindu wedding or nikah