३ वर्षांनी छोट्या मुस्लीम नेत्यासोबत बॉलिवूड अभिनेत्रीने थाटलाय संसार, म्हणाली- "सगळ्यांचा विरोध होता पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 18:38 IST2025-11-04T18:35:59+5:302025-11-04T18:38:19+5:30
एका बॉलिवूड अभिनेत्री तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल भाष्य केलं आहे. काही वर्षांपूर्वी या अभिनेत्रीने धर्माने मुस्लिम असेलल्या राजकीय व्यक्तीशी कोर्ट मॅरेज करत संसार थाटला होता. तिच्या लग्नाच्या बातमीने सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता.

३ वर्षांनी छोट्या मुस्लीम नेत्यासोबत बॉलिवूड अभिनेत्रीने थाटलाय संसार, म्हणाली- "सगळ्यांचा विरोध होता पण..."
बॉलिवूड सेलिब्रिटींचं पर्सनल आयुष्य हे कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. एका बॉलिवूड अभिनेत्री तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल भाष्य केलं आहे. काही वर्षांपूर्वी या अभिनेत्रीने धर्माने मुस्लिम असेलल्या राजकीय व्यक्तीशी कोर्ट मॅरेज करत संसार थाटला होता. तिच्या लग्नाच्या बातमीने सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून स्वरा भास्कर आहे. स्वराने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पती फहाद अहमद आणि त्यांच्या नात्याबाबत भाष्य केलं.
पति पत्नी और पंगा या रिएलिटी शोमध्ये स्वरा तिचा पती फहाद अहमदसोबत सहभागी झाली आहे. स्वराने नुकतीच बॉलिवूड बबलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, "आमच्या लग्नाला आता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. जेव्हा आम्ही लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा एकही व्यक्ती अशी नव्हती जिने आम्हाला पाठिंबा दिला. एकमेकांची साथ मिळवण्यासाठी आम्ही खूप लढलो आहोत. मी खूप घाईत निर्णय घेतेय असंही लोक मला म्हणाले होते".
"आम्ही दोघेही एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहोत. आमच्या कोणत्याच गोष्टी या मॅच होत नाहीत. आमचा धर्म जात सगळंच वेगळं आहे. आमच्या वयातही अंतर आहे. मी त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा तो सेटलही नव्हता. आताही तो पीएचडी करत आहे. फहादलाही लवकर लग्न करायचं नव्हतं. त्याला सेटल व्हायचं होतं. पण, मला असं वाटतं की आपण लाइफ पार्टनर निवडतोय त्यामुळे पैसे बघायची गरज नाही. मी तेव्हा सेटल होते. त्यामुळे माझा नवरा सेटल नसला तरी मला प्रॉब्लेम नव्हता", असं स्वरा म्हणाली.
पुढे तिने सांगितलं, "आमचा दोघांचाही एकमेकांवर विश्वास होता आणि तो बरोबर होता. आम्ही आज एकत्र आनंदी आहोत. सुरुवातीला आमच्या पालकांचाही विरोध होता. पण, तरीदेखील आम्ही एकमेकांना निवडलं. फहादबाबत सुरुवातीपासूनच मला विश्वास होता. मला वाटत होतं की मी बरोबर करतेय आणि हेच सांगेन की मी बरोबर होते".