'स्वदेस'फेम अभिनेत्रीचा पती आहे २८ हजार कोटींचा मालक, लँबोर्गिनी कार अपघातामुळे चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 10:17 AM2023-10-04T10:17:26+5:302023-10-04T10:18:49+5:30

'स्वदेस' फेम अभिनेत्री गायत्री जोशीचा पती आहे तरी कोण?

swades fame actress gayatri joshi s husband vikas oberoi s networth is of 28 thousand crores | 'स्वदेस'फेम अभिनेत्रीचा पती आहे २८ हजार कोटींचा मालक, लँबोर्गिनी कार अपघातामुळे चर्चेत

'स्वदेस'फेम अभिनेत्रीचा पती आहे २८ हजार कोटींचा मालक, लँबोर्गिनी कार अपघातामुळे चर्चेत

googlenewsNext

'स्वदेस' (Swades) फेम अभिनेत्री गायत्री जोशी (Gayatri Joshi) आठवतेय का? आपल्या साध्या लुकने तिने प्रेक्षकांना प्रेमात पाडलं. मात्र शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) एक हिट सिनेमा देऊन ती मोठ्या पडद्यावरुन गायबच झाली. गायत्री जोशीने सिनेमा रिलीज झाल्यानंतर काहीच वर्षात विकास ओबरॉय (Vikas Oberoi) या उद्योजकासोबत लग्न केले. लग्नानंतर ती संसारात व्यस्त झाली. आज अचानक गायत्री जोशी चर्चेत आली आहे. इटलीमध्ये अभिनेत्री पतीसोबत लँबोर्गिनीची सैर करत असतानाच त्यांच्या गाडीने समोरील फरारीला धडक दिली. यामध्ये फरारातील जोडप्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गायत्री आणि तिचे पती सुरक्षित आहेत.

कोण आहेत विकास ओबेरॉय?

विकास ओबेरॉय यांची भारतातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये गणना होते. ओबेरॉय रियल्टी लिमिटेड कंपनीचे ते अध्यक्ष आहेत. या कंपनीची मार्केट व्हॅल्यू सुमारे ३० हजार कोटी रुपये आहे. ५२ वर्षीय विकास ओबेरॉय यांची एकूण संपत्ती 3.5 बिलियन अमेरिकी डॉलर म्हणजेच तब्बल 28 हजार कोटी रुपये इतकी आहे. फोर्ब्सच्या भारतातील श्रीमंतांच्या यादीत ते ६५ व्या क्रमांकावर आहेत.

विकास ओबेरॉय यांचे वडील रणवीर ओबेरॉय यांनी ३० वर्षांपूर्वी ही कंपनी सुरु केली होती. कंपनी रिअल इस्टेटमध्ये काम करते. घर, ऑफिस, हॉटेल आणि दुकान यांसारख्या इस्टेट्समध्ये गुंतवणूक करते. गायत्री जोशी आणि विकास ओबेरॉय 2005 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांना दोन मुलं आहेत. लग्नानंतर गायत्रीनेही पतीच्या व्यवसायात हातभार लावला. दोघंही आलिशान आयुष्य जगतात. नुकतंच कार अपघातामुळे ही जोडी आता पुन्हा चर्चेत आली आहे.

Web Title: swades fame actress gayatri joshi s husband vikas oberoi s networth is of 28 thousand crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.