'स्वदेस' फेम गायत्री जोशीचा अपघातानंतरचा 'तो' फोटो व्हायरल, रस्त्यावरच बसलेली दिसली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 03:21 PM2023-10-05T15:21:50+5:302023-10-05T15:22:51+5:30

काल गायत्री जोशी आणि तिच्या नवऱ्याचा झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

swades fame actress gayatri joshi photo viral after accident in italy seen sitting on road | 'स्वदेस' फेम गायत्री जोशीचा अपघातानंतरचा 'तो' फोटो व्हायरल, रस्त्यावरच बसलेली दिसली अभिनेत्री

'स्वदेस' फेम गायत्री जोशीचा अपघातानंतरचा 'तो' फोटो व्हायरल, रस्त्यावरच बसलेली दिसली अभिनेत्री

googlenewsNext

'स्वदेस' फेम अभिनेत्री गायत्री जोशी (Gayatri Joshi) कालपासून चर्चेत आहे. आपल्या पतीसोबत इटलीच्या रस्त्यावर लँबॉर्गिनीमधून ती ड्राईव्हवर गेली होती. त्याचवेळी समोर असलेल्या फरारीला त्यांच्या लँबॉर्गिनीने धडक दिली. या अपघातात फरारीतील जोडप्याचा जागीच मृत्यू झाला. स्वित्झर्लंडचे 63 वर्षीय मेलिसा क्रॉटली आणि 67 वर्षीय मार्कस क्रॉल्टी यांचा या अपघातात जीव गेला. अपघातानंतर गायत्री जोशी रस्त्यावर बसलेली असल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

काल गायत्री जोशी आणि तिच्या नवऱ्याचा झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. इटलीच्या रस्त्यावर अतिशय वेगाने लक्झरी गाड्या एकमागोमाग एक जात होत्या. त्यातच गायत्री आणि तिचे पती विकास ओबेरॉय लाल रंगाच्या लँबोर्गिनीत होते. तर निळ्या रंगाच्या फरारीमध्ये स्वित्झर्लंडचं जोडपं होतं. लँबॉर्गिनीची धडक बसताच समोर असलेला टेम्पोही उलटला. शिवाय फरारीला आग लागली. या भीषण अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

या अपघातानंतर गायत्री जोशी रस्त्यावरच बसलेली दिसत आहे असा एक फोटो व्हायरल झालाय.तिने ऑफ व्हाईट रंगाचा ड्रेस घातला आहे तर डोक्यावर कॅप आहे. या अपघातानंतर ती प्रचंड धक्क्यात गेल्याचं दिसत आहे. हा फोटो पाठमोरा असून ती गायत्रीच असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

गायत्री जोशी ही शाहरुख खानच्या 'स्वदेस' सिनेमामुळे चर्चेत आली होती. एकच सिनेमा केल्यानंतर तिने अभिनयाला रामराम केला आणि ती लग्नबंधनात अडकली. यानंतर तिने पतीच्या व्यवसायात हातभार लावला. त्यांना दोन मुलंही आहेत.

Web Title: swades fame actress gayatri joshi photo viral after accident in italy seen sitting on road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.