सुश्मिता सेनने मुलींसोबतचा फोटो इन्स्टावर शेअर केला, रोहमन म्हणाला-'माय लाइफलाइन्स'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 18:51 IST2020-12-22T17:57:52+5:302020-12-22T18:51:40+5:30
सुश्मिता ने आपल्या मुलींसोबत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहे.

सुश्मिता सेनने मुलींसोबतचा फोटो इन्स्टावर शेअर केला, रोहमन म्हणाला-'माय लाइफलाइन्स'
अभिनेत्री सुश्मिता सेन तिचा प्रियकर रोहमन शॉल आणि तिच्या दोन्ही मुली रेनी आणि एलिसा सोबत ख्रिसमस आणि न्यू ईअर सेलिब्रेट करण्यासाठी दुबईला गेले आहेत. सुश्मिता ने आपल्या मुलींसोबत इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत.
फोटो शेअर करताना सुश्मिताने लिहिले की, "सर्व काही शक्य आहे. जोपर्यंत आपण आशा सोडत नाही. कोणीही आपला आनंद दाबू शकत नाही. तुमच्या सर्वांना खूप प्रेम ज्यांनी कधीही हार मानली नाही आणि मलाही नाही मानू दिली. लव्ह यू मित्रांनो. धन्यवाद. " या पोस्टवर रोहमनने कमेंट करत 'माय लाइफलाइन्स' लिहिले आहे.
रिपोर्टनुसार सुश्मिता आणि तिचे कुटुंब मोठ्या व्हॅकेशनवर गेले आहे. पश्चिम आशियामध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरा केल्यानंतर ती मुंबईत परतण्यापूर्वी कौटुंबिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कोलकाताला जाणार आहे.
सुश्मिताचा भाऊ देखील जॉईन करणार रिपोर्टनुसार, सुश्मिताचा भाऊ राजीव सेन आणि त्याची पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री चारू आसोपादेखील त्यांच्यासोबत सामील होतील. रियुनिट झाल्यानंतर चारू आणि राजीवची ही पहिली रोमँटिक सुट्टी असेल.