सुष्मिता सेनने लेकीसोबत एक्सरसाइज करतानाचा व्हिडीओ केला शेअर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2018 09:52 AM2018-05-04T09:52:52+5:302018-05-04T15:23:10+5:30

अभिनेत्री सुष्मिता सेनने लेकीसोबत एक्सरसाइज करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. यावेळी तिने एक इमोशनल मेसेजही पोस्ट केला.

Sushmita Sen did a video while exercising with Leki! | सुष्मिता सेनने लेकीसोबत एक्सरसाइज करतानाचा व्हिडीओ केला शेअर!

सुष्मिता सेनने लेकीसोबत एक्सरसाइज करतानाचा व्हिडीओ केला शेअर!

googlenewsNext
लिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या फिटनेसबद्दल खूपच अलर्ट आहे. ती न चुकता वर्कआउट करीत असते. केवळ तिच नाही तर आपल्या मुलींनाही ती फिटनेसवर अधिक लक्ष देण्याचा आग्रह धरत असते. त्यामुळेच जिममध्ये तिच्या मुलीही तिच्यासोबत वर्कआउट करताना बघावयास मिळतात. सुष्मिताने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही व्हिडीओ पोस्ट केले. ज्यामध्ये ती मुलगी रेनेसोबत वर्कआउट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना सुष्मिताने एक इमोशनल मेसेजही लिहिला. ज्यामध्ये, ‘किती अविस्मरणीय प्रवास राहिला आहे... तिच्या पहिल्या पावलापासून ते इथपर्यंतचा प्रवास... एक वाघीण आणि तिच्या शावक मुली... टीम वर्क सुरू आहे. खूपच गर्व वाटत आहे. आय लव्ह यू.’
 

दरम्यान, माजी मिस युनिव्हर्स असलेली सुष्मिता सेन तिच्या फिटनेसप्रती खूपच सतर्क आहे. तिची फिट आणि टोन्ड बॉडी बघून कोणीच म्हणणार नाही की, ती ४२ वर्षांची आहे. या वयात इतर अभिनेत्री आपल्या फिटनेसवर लक्ष देणे बंद करतात, त्या वयात सुष्मिता सेन आपल्या बॉडीवर जबरदस्त लक्ष केंद्रित करून आहे. ती सातत्याने वर्कआउट करतानाचे फोटोज् आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करीत असते. फिटनेसप्रती तिच्यात असलेली जागरूकता इतर अभिनेत्रींसाठी प्रेरणादायीच म्हणावे लागेल. 
 

आता तर तिच्या मुलीही सुष्मिताच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत. तिच्या दोन्ही मुली रेने आणि अलिशा तिच्यासोबत जिमला येणे पसंत करतात. दरम्यान, सुष्मिता बºयाच काळापासून मोठ्या पडद्यावरून गायब आहे. तिने लवकरात लवकर कमबॅक करावे अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे. काही दिवसांपूर्वी सुष्मितानेदेखील तिच्या कमबॅकबद्दल सांगताना म्हटले होते की, सध्या मी चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहेत. 

Web Title: Sushmita Sen did a video while exercising with Leki!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.