सुश्मिता सेनने बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत अशी साजरी केली दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 08:00 IST2018-11-08T20:00:00+5:302018-11-08T08:00:02+5:30
सुश्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या कुटुंबियांसोबतचा दिवाळी सेलिब्रेशनचा फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोत तिच्या मुलींसोबत रोहमन देखील दिसत आहे. सुश्मिताने तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली आहे.

सुश्मिता सेनने बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत अशी साजरी केली दिवाळी
सध्या बॉलिवूडमध्ये नव-नव्या जोडप्यांच्या प्रेमाची चर्चा रंगली आहे. अशीच एक जोडी म्हणजे सुश्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल. होय, सध्या सुश्मिता बिनधास्तपणे स्वत:पेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या या बॉयफ्रेन्डसोबत हातात हात घालून फिरताना दिसतेय. अगदी अलीकडे शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत हे कथित कपल एकत्र दिसले होते आणि आता तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या कुटुंबियांसोबतचा दिवाळी सेलिब्रेशनचा फोटो पोस्ट केला आहे आणि या फोटोत तिच्या मुलींसोबत रोहमन देखील दिसत आहे. सुश्मिताने तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली आहे.
सुश्मिताने या फोटोंसोबतच मैत्रिणीच्या घरातील काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या व्हिडिओत तिच्या मुली रेने आणि अलिशा बूम फ्लोस चॅलेंज शिकताना दिसत आहेत. तसेच या व्हिडिओतून सुश्मिताच्या मुली आणि रोहमन यांच्यात खूपच छान गट्टी जमलेली दिसून येत आहे.
२७ वर्षांचा रोहमन काही वर्षांपूर्वी मुंबईत शिफ्ट झाला आणि फार कमी वेळात देशातील लीडिंग फॅशन शोजमधील ओळखीचा चेहरा झाला. सध्या रोहमन फॅशन इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. ४२ वर्षांची सुश्मिता रोहमनच्या प्रेमात पडली आहे आणि हे रिलेशनशिप तिने जवळपास कन्फर्म केले आहे. रोहमनने सुश्मिताचं नाही तर तिच्या दोन्ही मुलींचीही मने जिंकली आहेत. अलीकडे सुशने मुलगी रिनीसोबतचा रोहमनचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
याआधी सुश्मिताचे नाव अनेकांशी जुळले आहे. इंडस्ट्रीत अगदी नवखी असताना सुश्मिता आणि विक्रम भट्ट या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. सुश्मितासाठी विक्रमने आपल्या पत्नी, मुलीलाही सोडले होते. पण इतके करूनही सुश्मिता विक्रमच्या आयुष्यात टिकली नाही. पुढे विक्रमने या रिलेशनशिपबद्दल पश्चातापही व्यक्त केला होता. विक्रमनंतर सुश्मिताच्या आयुष्यात रणदीप हुड्डाची एन्ट्री झाली. सुश्मिताची दत्तक मुलगी रेनी हिलाही रणदीप आवडायचा. पण काही वर्षांत या रिलेशनशिपचाही शेवट झाला. केवळ रणदीपचं नाही तर, वसीम अक्रम, बंटी सचदेवा, संजय नारंग, बिल्डर इम्तियाज खत्री यांच्यासोबतही सुश्मिताचे नाव जोडले गेले.