सुश्मिता सेनचे होणार ‘शॉर्ट’ दर्शन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 16:51 IST2017-01-24T10:47:09+5:302017-01-24T16:51:45+5:30

माजी मिस युनिव्हर्स सुश्मिता  सेन दीर्घकाळापासून चर्चेत नाही. पण अलीकडे एका बातमीने सुश्मिता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. होय, ही बातमी ...

Sushmita Sen to be 'short' philosophy !! | सुश्मिता सेनचे होणार ‘शॉर्ट’ दर्शन!!

सुश्मिता सेनचे होणार ‘शॉर्ट’ दर्शन!!

जी मिस युनिव्हर्स सुश्मिता  सेन दीर्घकाळापासून चर्चेत नाही. पण अलीकडे एका बातमीने सुश्मिता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. होय, ही बातमी म्हणजे ६५ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत सुश्मिता जज म्हणून दिसणार. आता आमच्याकडे याशिवाय आणखी एक बातमी आहे. ती म्हणजे, लवकरच सुश्मिता आपल्याला एका शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे. सुश्मिता  सेन  वाईल्ड लाईफशी संबंधित ‘वाईल्ड अ‍ॅट हार्ट’ या मोहिमेचा भाग असणार आहे. याअंतर्गत एक दोन मिनिटांशी शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली आहे. या शॉर्ट फिल्मचे नाव आहे, ‘आय एम दी फॉरेस्ट.’ देशातील वन क्षेत्र आणि वन्य प्राणी यांच्यावर आधारित या शॉर्ट फिल्ममध्ये सुश्मिता एक संदेश देताना दिसणार आहे. विशेष म्हणजे काव्यात्मक रूपात ती हा संदेश देणार आहे. सुश्मिताच्या तोंडची ही कविता हर्षल शेटये याने लिहिली आहे. सुश्मिताची ही शॉर्ट फिल्म चित्रपटगृहांमध्येही दाखवली जाणार आहे.

सुश्मिता सेन सध्या मिस युनिव्हर्सच्या  सौंदर्य स्पर्धेच्या निमित्ताने मॅनिला येथे रवाना झाली आहे. अवघ्या सोळाव्या सुश्मिता सेनने वर्षी मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. यानंतर माहेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर सुश्मिता अनेक चित्रपटांत दिसली. तिचा ‘बीवी नंबर वन’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कारही मिळाला होता. सुश्मिताने ‘आँखे’, ‘समय’, ‘मैं हूं ना’, ‘बेवफा’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘मैने प्यार क्यू किया’ या चित्रपटांमध्येही सुश्मिता  झळकली. यातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. गेल्या काही वर्षांत मात्र सुश्मिता  बॉलिवूडमध्ये फारसी दिसली नाही. आता शॉर्ट फिल्मच्या रूपात का होईना, सुश्मिता पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे.

Web Title: Sushmita Sen to be 'short' philosophy !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.