Shocking! Sushmita Senचं झालं ब्रेकअप?, बॉयफ्रेंड रोहमन शॉलनं सोडलं अभिनेत्रीचं घर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 03:24 PM2021-12-23T15:24:55+5:302021-12-23T15:25:25+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल (Rohman Shawl) अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

Sushmita sen and rohman shawl broken all ties model moved out of her house | Shocking! Sushmita Senचं झालं ब्रेकअप?, बॉयफ्रेंड रोहमन शॉलनं सोडलं अभिनेत्रीचं घर!

Shocking! Sushmita Senचं झालं ब्रेकअप?, बॉयफ्रेंड रोहमन शॉलनं सोडलं अभिनेत्रीचं घर!

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन  (Sushmita Sen)  आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल  (Rohman Shawl) अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. प्रत्येक इव्हेंटमध्ये ते एकत्र दिसतातच, ऐवढंच नाही तर रोहमन अभिनेत्रीच्या घरीच राहायचा. त्यांच्या लग्नाबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या, पण आता अशी बातमी समोर येत आहे, ज्यामुळे चाहत्यांची निराशा होऊ शकते. होय, हे कपल आता वेगळे झाल्याचे बोलले जात आहे. दोघांनी हे नाते संपवले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुष्मिता आणि रोहमनमध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या येत होत्या. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, दोघांनीही त्यांचे नाते संपवले आहे. रोहमन आता सुष्मिताच्या घरीही राहत नाही. तो अभिनेत्रीचे घर सोडून मित्राच्या घरी शिफ्ट झाला आहे.

सुष्मिता आणि रोहमनच्या लग्नाबाबत अनेक बातम्या समोर आल्या होत्या, पण एका मुलाखतीत रोहमन म्हणाला होता, 'सुष्मिता, तिच्या मुली (रेनी आणि अलिशा) आणि मी एक कुटुंब आहोत. कधी मी मुलींसोबत वडिलांसारखा वागतो तर कधी त्यांच्याशी मित्रासारखे वागते. त्यावेळी आम्ही भांडतो. आम्ही एका सामान्य कुटुंबाप्रमाणे जगतो.आम्ही एकत्र राहण्याचा आनंद घेतो. म्हणूनच 'तुझे लग्न कधी होणार आहे?' यासारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो. लग्न झाल्यावर ते लपून राहणार नाही. 

यावर्षी फेब्रुवारीमध्ये सुष्मिताने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने बिघडलेल्या नात्यातून बाहेर पडण्याबद्दल लिहिले होते. यानंतर चाहत्यांनी अंदाज लावला की तिचे रोहमनसोबत ब्रेकअप झाले आहे का? मात्र, या दोघांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र हजेरी लावून या अफवेला पूर्णविराम दिला.
 

Web Title: Sushmita sen and rohman shawl broken all ties model moved out of her house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.