सुशांत सिंग राजपूतचा फायनल पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, रिपोर्टमधून स्पष्ट झाले मृत्यूचे खरे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 10:57 IST2020-06-25T10:56:57+5:302020-06-25T10:57:15+5:30
पोलिसांना सुशांतच्या अंतिम पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट मिळाला आहे.

सुशांत सिंग राजपूतचा फायनल पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, रिपोर्टमधून स्पष्ट झाले मृत्यूचे खरे कारण
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंबई पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, पोलिसांना सुशांतच्या अंतिम पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मिळाला आहे. यासाठी मुंबईतील पाच डॉक्टरांची टीम साइन केली होती. रिपोर्टनुसार, पोस्टमॉर्टमनुसार सुशांतच्या शरीरावर कोणताही संघर्ष किंवा दुखापतींचा निशान सापडलेले नाहीत. त्याच्या मृत्यूचे कारण गळफास घेतल्यामुळे गुदमरल्याने झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्याची नखेही स्वच्छ आढळली आहेत. रिपोर्टमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की सुशांतच्या मृत्यूचे कारण आत्महत्या आहे.
मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचे वडील, बहिणी, नोकर, मॅनेजर, रिया चक्रवर्तीसह अनेकांचा जबाब नोंदवून घेतला आहे. सुशांतचा मृत्यू नाही हत्या असल्याचे आरोप अभिनेत्री कंगना राणौतसह मोठमोठ्या दिग्दर्शकांनी केले. 17 जूनला बिहारमध्ये सलमान खान, करण जोहर, एकता कपूर, संजय लीला भन्साळी, आदित्य चोप्रा,भूषण कुमार त्यांच्याविरोधात खटलाच दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणौतला आणि अन्य काही लोकांना याप्रकरणी साक्षीदार बनविण्यात आले आहे.
अभिनेता शेखर सुमनने सुशांतच्या आत्महत्येवर विश्वास बसत नसल्याचं सांगितलं. शेखर सुमनने एक फोरम सुरू केली आहे. या माध्यमातून सीबीआय चौकशीसाठी दबाव आणता येईल.
Im forming a Forum called #justiceforSushantforum.where i implore just about ev one to pressurize the govt to launch a CBI inquiry into Sushant's death,raise their voices against this kind of tyranny n gangism and tear down the mafias.i solicit your support.
— Shekhar Suman (@shekharsuman7) June 23, 2020