सुशांत सिंग राजपूत आत्महत्येबाबत तुंबाड दिग्दर्शकाचा मोठा खुलासा, सकाळी इतक्या वाजेपर्यंत whatsappवर होता Active
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 14:54 IST2020-06-18T14:49:24+5:302020-06-18T14:54:52+5:30
दिग्दर्शक आनंद गांधी सुशांतचा चांगला मित्र आहे.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्येबाबत तुंबाड दिग्दर्शकाचा मोठा खुलासा, सकाळी इतक्या वाजेपर्यंत whatsappवर होता Active
अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जूनला रविवारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत डिप्रेशनमध्ये होता. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करतायेत. तुंबाड सिनेमाचा दिग्दर्शक आनंद गांधी सुशांत सिंग राजपूतच्या व्हाट्सअॅप डिटेला घेऊन नव्या खुलासा केला आहे. दिग्दर्शक आनंद गांधी सुशांतचा चांगला मित्र आहे.
फिल्मी बिटच्या रिपोर्टनुसार आनंद गांधीने दावा केला आहे की, सुशांत सिंग राजपूतचे व्हाट्सअप 14 जून सकाळी नऊ वाजेपर्यंत अॅक्टिव्ह होते. हे त्याने सुशांतचे लास्ट सीनच्या आधारावर सांगितले आहे. सुशांतच्या जाण्याने आनंद गांधीचा धक्का बसला आहे.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची देखील चौकशी करण्यात आली आहे. तिला मदतीसाठी बोलवण्यात आले आहे. असेही सांगितले जात आहे की या प्रकरणात सुशांतचा कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रादेखील चौकशीसाठी मदत करतो आहे. टाइम्सच्या रिपोर्टनुसार प्राथमिक चौकशीत पोलिसांच्या निदर्शनास आले आहे की सुशांतकडे कामाची कमतरता असल्यामुळे त्याने हे पाऊल उचलले आहे. मात्र अजून बऱ्याच गोष्टींचा तपास व चौकशी सुरू आहे. सुशांतच्या निधनानंतर इंडस्ट्रीत जबरदस्त युद्ध रंगलेले पहायला मिळत आहे. एकीकडे इंडस्ट्रीतील घराणेशाहीला जबाबदार ठरवले जात आहे तर दुसरीकडे त्याच्या खासगी आयुष्याला जबाबदार ठरवले जात असल्याचं पहायला मिळतंय.