​सुशांत सिंग राजपूत घेतोय ‘नासा’मध्ये प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 21:22 IST2017-01-21T15:51:23+5:302017-01-21T21:22:44+5:30

सुशांतने नुकतेच क्रिती सेनॉन सोबतच्या ‘राबता’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यानंतर तो ‘चंदामामा दूर के’ या चित्रपटात झळकणार आहे. यात तो एका अंतरावीराची भूमिका साकारणार असल्याचे कळते.

Sushant Singh Rajput is taking training in 'NASA' | ​सुशांत सिंग राजपूत घेतोय ‘नासा’मध्ये प्रशिक्षण

​सुशांत सिंग राजपूत घेतोय ‘नासा’मध्ये प्रशिक्षण

लिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आपला ३१ वा वाढदिवस साजारा करीत असतानाच त्याने आणखी एक बातमी दिली आहे. सुशांतच्या आगामी चित्रपटाच्या प्रशिक्षणासाठी अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासामधून प्रशिक्षण घेत आहे. त्याने याचे काही फ ोटो आपल्या शेअर केले आहेत. 

मागील वर्षी ब्लॉक बस्टर ठरलेल्या एम.एस.धोनी : अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाचा नायक सुशांत सिंग राजपूत चांगलाच चर्चेत आला आहे.  सुशांतने नुकतेच क्रिती सेनॉन सोबतच्या ‘राबता’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यानंतर तो ‘चंदामामा दूर के’ या चित्रपटात झळकणार आहे. यात तो एका अंतरावीराची भूमिका साकारणार असल्याचे कळते. या चित्रपटासाठी त्याने खास प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली असून यासाठी त्याने थेट जगातील सर्वांत मोठी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’शी संपर्क केला आहे. या प्रशिक्षणाचे सत्र सुरू झाले असून त्याने पहिल्याच दिवशी बोर्इंग 737 या विमानाच्या कॉकपीटमध्ये बसलेला दिसतो आहे. सुशांत सिंग राजपूतने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करताना लिहलेय, रोमांच सर्वोच्च बिंदूवर! ‘चंदामामा दूर के’च्या प्रशिक्षणासाठी बोर्इंग 737 च्या कॉकपीटमध्ये! ऊंच भरारी! Read More : ‘ही’ अभिनेत्री आहे सुशांतसिंग राजपूतची प्रेयसी

 

चंदामामा दूर के हा चित्रपटाचे दिग्दर्शन संजय पूरण सिंग चौहान करीत आहे. सध्या तरी या चित्रपटाबद्दल कोणतिही माहिती देण्यात आली नाही, मात्र हा चित्रपट भारताचे अंतराळ कार्यक्र म २०१७-१८ यावर आधारित असेल असे सांगण्यात येते. या नियोजित कार्यक्रमानुसार भारतीय अंतराळ यात्री चंद्रावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत.  Read More : ​सुशांत सिंग राजपूत, क्रिती सेनन यांचे स्पेशल न्यू इयर सेलिब्रेशन

 


सुशांत सिंग राजपूतने आपला ३१ वा वाढदिवस आपल्या खास मित्र-मैत्रिणींसोबत साजरा केला. यावेळी ‘राबता’ या चित्रपटातील त्याची जोडीदार क्रिती सेनॉन देखील हजर होती. त्याने आपल्या वाढदिवसाचे फ ोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. या फ ोटोमध्ये हुमा कुरेशी, प्रिती झिंटा, मनीष मल्होत्रा, संजय लीला भन्साळी, आर. माधवन, हर्षवर्धन कपूर, सूरज पांचोली आदी हजर होते. 

Web Title: Sushant Singh Rajput is taking training in 'NASA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.