सुशांतच्या आत्महत्येनंतर नेटक-यांनी करण जोहर व आलियाला केले टार्गेट, करून दिली त्या व्हिडीओची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 11:57 AM2020-06-15T11:57:12+5:302020-06-15T11:58:25+5:30

सुशांतच्या मृत्यूनंतर दिग्दर्शक व निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री आलिया भट सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड करत आहेत. लोकांनी या दोघांना चांगलेच सुनावले आहे.

sushant singh rajput suicide netizens bashed karan johar alia bhatt on social media over old video | सुशांतच्या आत्महत्येनंतर नेटक-यांनी करण जोहर व आलियाला केले टार्गेट, करून दिली त्या व्हिडीओची आठवण

सुशांतच्या आत्महत्येनंतर नेटक-यांनी करण जोहर व आलियाला केले टार्गेट, करून दिली त्या व्हिडीओची आठवण

googlenewsNext
ठळक मुद्देआत्तापर्यंत तुमच्यासारख्या इंडस्ट्रीतल्या बड्या लोकांनी सुशांत सारख्या अनेकांना आऊटसाइडरसारखी वागणूक दिलीय, अशा शब्दांत युजर्सनी आलियाचा क्लास घेतला.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने अचानक जगातून एक्झिट घेतली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. सुशांतने आत्महत्या का करावी, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलावे? त्याच्या खासगी आयुष्यात इतकी मोठी अशी काय समस्या होती? असे सगळे प्रश्न सर्वांना पडले आहेत. सोशल मीडियावरच्या लोकांच्या पोस्टमध्येही हेच प्रश्न आहेत. याचदरम्यान सुशांतच्या मृत्यूनंतर दिग्दर्शक व निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री आलिया भट सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड करत आहेत. लोकांनी या दोघांना चांगलेच सुनावले आहे.
करण जोहर व आलियाने सुशांतच्या निधनावर शोक व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आणि अनेक नेटकरी संतापले. नेटक-यांनी करण व आलियाला एक जुना व्हिडीओ शोअर करत दोघांना फैलावर घेतले. या जुन्या व्हिडीओत करण व आलियाने सुशांतची खिल्ली उडवल्याचा आरोप नेटक-यांनी केला.

सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यानंतर करण जोहरने आपल्या सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली होती. यात त्याने सुशांतच्या आत्महत्येमुळे आपल्याला मोठा धक्का बसला असल्याचे आपण यासाठी दोषी असल्याचे सांगत अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही, असे म्हटले होते.

‘मी स्वत:ला दोषी मानतो कारण गेली वर्षभर मी तुझ्या संपर्कात राहिलो नाही. तुला आपले आयुष्यातील दु:ख शेअर करण्यासाठी कुणाचीतरी गरज आहे, असे मला अनेकदा जाणवले. मात्र मी व्यक्त झालो नाही. अशी चूक मी पुन्हा कधीच करणार नाही. आपल्याला फक्त नातं बनवून फायदा नाही तर ते निभावणेही तितकेच गरजेचे आहे. सुशांतच्या निधनामुळे मला मोठा धक्का बसला आहे. सर्व नाती सांभाळण्याची गरज आहे, याची जाणीव मला करून दिली. मला तुझे ते गोड हसू आणि मिठी कायम लक्षात राहिल.’, असे करणने लिहिले़ होते. त्याच्या या पोस्टनंतर अनेक युजर्सनी करणला ट्रोल केले.

काहींनी त्याला  Nepotismचा प्रमोटर म्हटले तर काहींनी़ Hypocrite म्हटले. आलियासोबत मिळून तूच सुशांतची खिल्ली उडवली होती, याची युजर्सनी करणला आठवण करून दिली.


आलियालाही लोकांनी ट्रोल केले. अचानक तुला सुशांतचा पुळका येतोय. आत्तापर्यंत तुमच्यासारख्या इंडस्ट्रीतल्या बड्या लोकांनी सुशांत सारख्या अनेकांना आऊटसाइडरसारखी वागणूक दिलीय, अशा शब्दांत युजर्सनी आलियाचा क्लास घेतला.

Web Title: sushant singh rajput suicide netizens bashed karan johar alia bhatt on social media over old video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.