सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात?, मुंबई पोलिसांनी आता केली ही गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 17:34 IST2020-07-13T17:33:58+5:302020-07-13T17:34:19+5:30
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला जवळपास एक महिना होत आला. तरीदेखील अद्याप त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समोर आलेले नाही. जवळपास तीस पेक्षा जास्त जणांची चौकशी केली आहे.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात?, मुंबई पोलिसांनी आता केली ही गोष्ट
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला जवळपास एक महिना होत आला. तरीदेखील अद्याप त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समोर आलेले नाही. जवळपास तीस पेक्षा जास्त जणांची चौकशी केली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाच्या अंतिम टप्प्यावर पोहचल्याची शक्यता आहे. 'झी न्यूज हिंदी'च्या रिपोर्ट्सनुसार शनिवारी या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी फॉरेन्सिक टीमची भेट घेतली.
पोलिसांशी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये फॉरेन्सिक विभागाचा अहवाल मुंबई पोलिसांना देण्यात येईल. या प्रकरणी गरज भासल्यास आणखी काहींचे जबाब नोंदवला जाऊ शकतो. मुंबई पोलीस आणि फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीतून कोणत्याही प्रकारची धक्कादायक माहिती समोर आलेली नाही. पण, तरीही आता अखेरच्या रिपोर्टकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी सलमान खानकडे एकेकाळी मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या रेश्मा शेट्टीचीही चौकशी केली. जवळपास पाच तास तिची चौकशी केल्याचे समजते आहे. सलमान खानकडे काम करणे बंद केल्यानंतर रेश्माने तिची स्वत:ची वेगळी अशी टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीही सुरु केली होती. आपण सुशांतला आतापर्यंत फक्त दोन वेळाच भेटल्याची माहिती या चौकशीदरम्यान तिने दिल्याचं कळत आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने 14 जून रोजी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांतने डिप्रेशनमुळे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे तर कुणी बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.