सुशांत सिंग राजपूत त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत दिसला कॉफी घेताना दिसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2017 11:12 IST2017-05-10T05:42:40+5:302017-05-10T11:12:40+5:30

पवित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची जोडी छोट्या पडद्यावर सगळ्यांना खूप पसंत केली ...

Sushant Singh Rajput seen taking coffee while he was seen with his X girlfriends | सुशांत सिंग राजपूत त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत दिसला कॉफी घेताना दिसला

सुशांत सिंग राजपूत त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत दिसला कॉफी घेताना दिसला

ित्र रिश्ता या मालिकेच्या माध्यमातून सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची जोडी छोट्या पडद्यावर सगळ्यांना खूप पसंत केली होती. ऑनस्क्रिन केमिस्ट्रीबरोबर त्यांची ऑफस्क्रिन केमिस्ट्रीपण हिट झाली होती. हे दोघेही एकमेकांना दीर्घकाळ डेट करत होते.  त्यानंतर या दोघांमध्ये काहीतरी बिनसले आणि ते वगळे झाले. एका वर्षानंतर ते वेगळे का झाले याचे कारण तुम्हाला माहिती आहे का ?  ब्रेकअपनंतर एक वर्षांनी पुन्हा एकदा त्यांना एकत्र पाहण्यात आले. सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांना मुंबईतल्या लोखंडवाला परिसरात कॉफी पिताना एकत्र पाहण्यात आले. मात्र सुशांतच्या जवळ असलेल्या सूत्रांनी या गोष्टीला चुकीचे ठरवले आहे.  सुशांत आणि अंकिता 6 वर्ष  लिव इनमध्ये राहात होते. पवित्र रिश्ताच्या सेटवर ते एकमेंकांच्या प्रेमात पडले होते. त्यांच्या ब्रेकअपची वेगवेगळी कारणसमोर आली होती. कधी अंकित जास्त पझेसिव्ह असल्याने त्यांचे नाते संपुष्टात आले असल्याचे बोले जात होते तर कधी अंकितला सुशांतसोबत लग्न करुन सेटल व्हायचे होते मात्र सुशांतचा एवढ्यात लग्नाचा विचार नव्हता.   

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार हे दोघे खूप बोलत नव्हते पण एकत्र बसले होते. सुशांत आणि अंकिताने मात्र असे काही घडले नसल्याचे सांगितले आहे. मात्र जर हे दोघे भेटले असतील तर ते काही असेच नाही. त्यामागे जरुर काही तरी कारण असेल. सुशांतचा राबता हा चित्रपट रिलीज होणार आहे ज्यात त्याच्या अपोझिट क्रिती सेनन असणार आहे, सुशांत आणि क्रितीचे अफेअर असल्याचा पण चर्चा आहे. मात्र आता सुशांत अंकितासोबत दिसल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगताना दिसतायेत. 

Web Title: Sushant Singh Rajput seen taking coffee while he was seen with his X girlfriends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.