ब्रेकअपनंतर एकमेकांशी कधीच बोलले नव्हते सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 12:41 IST2020-09-01T12:33:52+5:302020-09-01T12:41:39+5:30
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआय रोज एक नवा खुलासा करते आहे.

ब्रेकअपनंतर एकमेकांशी कधीच बोलले नव्हते सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआय रोज एक नवा खुलासा करते आहे. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे त्याच्या कुटुंबासोबत या लढ्यात उभी राहिली आहे. सुशांत आणि अंकिताचे 2016मध्ये ब्रेकअप झाले होते. त्यानंतर सुशांतने कधीच मागे वळून पाहिले नाही. सुशांत आणि अंकिता यानंतर कधीही एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला नाही. दोघांचे मार्ग पूर्णपणे वेगळे झाले आणि ते कधीही एकमेकांना भेटले नाहीत.
अंकिता सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी लढतेय
दोघे ब्रेकअपनंतर कधीही एकमेकांशी साधे बोललेसुद्धा नाही. तिच अंकिता सुशांतच्या निधनानंतर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते आहे. रियाने केलेल सगळे दाव्यांवर अंकिताने तिला चोख उत्तर देतेय. सुशांतच्या कुटुंबासोबत या लढ्यात ती सावलीसारखी उभी आहे.
सुशांतला घेऊन अंकिता होती इमोशनल
अंकिता सुशांतला घेऊन खूप इमोशनल होती. सुशांतचे करिअर यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर सुशांतसाठी जवळपास तिने अभिनय सोडला होता. टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा असल्याने तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. ब्रेकअपनंतरही सुशांतचा कोणताही सिनेमा शुक्रवारी रिलीज होताच अंकिता देवाकडे त्याच्या यशासाठी प्रार्थना करायची.
अंकिता लोखंडेने दाखवला ‘पॉवर ऑफ वुमन’, रिया चक्रवर्तीच्या ‘विधवा’ कमेंटवर असे दिले प्रत्युत्तर