अंकिता लोखंडेसोबत काही वर्षांपूर्वी झालेल्या ब्रेकअपमुळे डिप्रेशनमध्ये गेला होता सुशांत सिंह राजपूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 17:40 IST2020-06-14T17:31:47+5:302020-06-14T17:40:50+5:30
अंकिता लोखंडेसोबत झालेल्या ब्रेकअपची चांगलीच चर्चा झाली होती.

अंकिता लोखंडेसोबत काही वर्षांपूर्वी झालेल्या ब्रेकअपमुळे डिप्रेशनमध्ये गेला होता सुशांत सिंह राजपूत
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुंबईतल्या वांद्रामधील राहत्या घरी त्याचा मृतदेह मिळाला आहे. अद्याप सुशांतच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. मुंबई पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सुशांतच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 34 वर्षांच्या सुशांत फार कमी वेळात त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. छोटा पडदा ते चित्रपट हा सुशांतचा प्रवास अविश्वनिय होता.
सुशांत सिंग पर्सनल लाईफला आयुष्याला घेऊन चर्चेत असायचा. अंकिता लोखंडेसोबत झालेल्या ब्रेकअपची चांगलीच चर्चा झाली होती. अंकिता प्रचंड दु:खी झाली होती तर सुशांतपण आतून तुटला होता. मात्र काही वेळानंतर दोघे आपआपल्या आयुष्यात पुढे निघून गेले.
अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. दोघांच्या अफेअरच्या चर्चा लग्नापर्यंत जाऊन पोहोचल्या होत्या पण त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होती. पुढे 2016 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं.
'काय पो छे’ या सिनेमातून सुशांतने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. या चित्रपटानंतर शुद्ध देसी रोमान्स या सिनेमात तो झळकला. पण बॉलिवूडमध्ये त्याला खरी ओळख दिली ती ‘एम एस धोनी-अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमाने. या सिनेमात त्याने भारताचा माजी क्रिकेट कर्णधार एम. एस. धोनीची भूमिका साकारली होती. त्याने धोनीची भूमिका पडद्यावर अशी काही जिवंत केली की, या सिनेमाने इतिहास रचला. हा सुशांतचा पहिला सुपरडुपर हिट सिनेमा होता. या चित्रपटानंतर ‘केदारनाथ’ या सिनेमात तो सारा अली खानसोबत दिसला होता. सोनचिडीया, छिछोरे या सिनेमातही त्याने काम केले.