सुशांत सिंग राजपूतला लागली मोठी लॉटरी, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 20:08 IST2019-01-08T20:07:10+5:302019-01-08T20:08:06+5:30

छोट्या पडदा ते रुपेरी पडदा असा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतने बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे

Sushant Singh Rajput got lottery, Know about it | सुशांत सिंग राजपूतला लागली मोठी लॉटरी, जाणून घ्या याबद्दल

सुशांत सिंग राजपूतला लागली मोठी लॉटरी, जाणून घ्या याबद्दल

छोट्या पडदा ते रुपेरी पडदा असा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतने बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘काय पो चे’, ‘केदारनाथ’ या चित्रपटांतील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र खूप कौतूक झाले. नुकताच त्याचा ‘केदारनाथ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात उत्तराखंडमधील प्रेमकथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटात सुशांत सोबत अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत होती. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. या चित्रपटामुळे सुशांतला लॉटरी लागली आहे. या चित्रपटानंतर त्याला जवळपास १२ नवीन चित्रपटांचे ऑफर्स मिळाले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुशांतने स्वत: ही माहिती दिली आहे.

‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत सुशांतने सांगितले की ‘बारा चित्रपटांशी संबंधित माझी चर्चा सुरू आहे पण त्यापैकी सुरुवात कशाने करावी हे मला कळत नाही आहे.’ सुशांत आगामी ‘सोन चिरैया’ आणि ‘किझी और मॅनी’ या दोन चित्रपटांत झळकणार आहे.

याशिवाय ‘छिछोरे’ आणि ‘चंदा मामा दूर के’ यामध्येही तो मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. 

सुशांत सिंग राजपूतचा आगामी चित्रपट ‘सोन चिरैया’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चंबळच्या खो-यातील दरोडेखोरांच्या आयुष्यावर आधारित असलेला हा चित्रपट इश्किया , डेड इश्किया आणि  उडता पंजाब असे हिट सिनेमे देणारे दिग्दर्शक अभिषेक चौबे दिग्दर्शित करताहेत. सुशांत आगामी वर्षात किती सिनेमे साईन करतो हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Sushant Singh Rajput got lottery, Know about it