सुशांतच्या केसमध्ये 'ते' 20 लोक एनसीबीच्या रडारवर, Bigg Bossचा स्पर्धक एजाज खानच्या नावाचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 16:34 IST2020-08-28T16:21:38+5:302020-08-28T16:34:42+5:30
सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला दरदिवशी नवं वळणं लागतंय.

सुशांतच्या केसमध्ये 'ते' 20 लोक एनसीबीच्या रडारवर, Bigg Bossचा स्पर्धक एजाज खानच्या नावाचाही समावेश
सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला दरदिवशी नवं वळणं लागतंय. रिया चक्रवर्तीवर वर सुशांतला ड्रग्स देण्याचा आरोप लावण्यात आला आहे. असे काही व्हाट्सअॅप समोर आले आहेत ज्यात रिया सुशांतच्या स्टाफसोबत ड्रग्सच्या व्यवहाराविषयी चर्चा केल्याची माहिती आहे. एनसीबीने ड्रग्सचा उल्लेख झाल्यावर चौकशीसाठी केस दाखल केली आहे. रिया चक्रवर्ती, सुशांतच्या घरातला मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, टॅलेंट मॅनेजर जया साहा आणि गौरव आर्या यांच्या विरोधात केस दाखल करण्यात आली आहे. या चौघांची 67 NDPSच्या अंतर्गत तपासणी होणार. ज्यानंतर त्यांना व्हॉट्सअॅप वरुन प्रश्न विचाराले जाणार. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार ड्रग्स पुरवठा प्रकरणात सामील झालेल्या 20 लोकांची एनसीबी चौकशी करेल.
सुशांत सिंग राजपूत ड्रग्स प्रकरणात एनसीबीच्या रडारवर 20 जण
रिपोर्टनुसार एनसीबीने याप्रकरणी चौकशीसाठी 20 लोकांची लिस्ट तयार केली आहे. ज्यात गौरव आर्या, स्वेद लोहिया, जया साहा, बिग बॉसच्या एक्स प्रतियोगी एजाज खान, फारुख बत्त, बकुल चंदानी यांच्या नावाचा समावेश आहे. गौरव आर्य अक्षित शेट्टीसोबत फरार असल्याचे समजते.
सुशांतच्या बाळाची आई होण्याबाबत पहिल्यांदाच रियाने केला खुलासा, एकमेकांना दिलं होतं वचन!
कोण आहे रिया चक्रवर्ती ?
सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती हे नाव अचानक प्रकाशझोतात आले. सुशांत सिंग राजूपत प्रकरणात रिया मुख्य आरोपी आहे. अकिंता लोखंंडेशी ब्रेकअप झाल्यानंतर सुशांतच्या आयुष्यात रियाची एंट्री झालीय.रिया चक्रवर्तीने ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. 'दोबारा', 'हाफ गर्लफ्रेन्ड', 'बँक चोर' अशा अनेक चित्रपटांत ती झळकली आहे.‘मेरे डॅड की मारूती’मधून ती प्रकाशझोतात आली होती. तसेच तिच्याबाबत नेहमी क्युट अभिनेत्री असे बोलले जायचे अशीच इमेज इंडस्ट्रीत बनू नये म्हणून तिने बोल्ड फोटोशूट करत सोशल मीडियावर सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र रियाला हवं तसं यश बॉलिवूडमध्ये मिळाले नाही.