सुशांतसिंग राजपूत अन् सारा अली खान कोणत्या विषयावर एवढी गंभीर चर्चा करीत असावेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 14:44 IST2017-08-19T09:13:56+5:302017-08-19T14:44:38+5:30

स्टार किड्स सारा अली खान हिला पडद्यावर बघण्यासाठी चाहते अक्षरश: आतुर झाले आहेत. सैफ अली खान, अमृता सिंगची मुलगी ...

Sushant Singh Rajput and Sara Ali Khan are discussing such a matter so serious? | सुशांतसिंग राजपूत अन् सारा अली खान कोणत्या विषयावर एवढी गंभीर चर्चा करीत असावेत?

सुशांतसिंग राजपूत अन् सारा अली खान कोणत्या विषयावर एवढी गंभीर चर्चा करीत असावेत?

टार किड्स सारा अली खान हिला पडद्यावर बघण्यासाठी चाहते अक्षरश: आतुर झाले आहेत. सैफ अली खान, अमृता सिंगची मुलगी असलेल्या साराकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा असून, तिने बॉलिवूडमध्ये धमाकेदार आगमन करून टॉप अभिनेत्रींना कडवी टक्कर द्यावी, असा सूर व्यक्त केला जात आहे. मात्र खरं बघितलं तर साराला हे सर्व काही एवढे सोपे नसेल हेही तेवढेच खरे आहे. कारण साराबरोबर श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरही लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असून, या दोघींमध्ये जबरदस्त घमासान रंगेल, असेच काहीसे दिसत आहे. असो, सारा सध्या अभिषेक कपूर यांच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करीत असून, त्यामध्ये तिच्या अपोझिट सुशांतसिंग राजपूत असणार आहे. 

सारा या चित्रपटामुळे चांगली उत्साहित असून, सध्या सर्व लक्ष त्यावर केंद्रित करून आहे. काही दिवसांपूर्वीच यासंबंधी एक फोटो समोर आला होता. ज्यामध्ये सुशांत, सारा, अभिषेक आणि अमृता बघावयास मिळाले. आता पुन्हा एकदा यासंबंधी एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये सुशांत आणि सारा चर्चा करताना दिसत आहेत. हा फोटो अभिषेक कपूर यांनी ट्विटर हॅण्डलवर पोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करताना अभिषेकने लिहिले की, ‘सारा आणि सुशांतने या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचण्यास सुरुवात केली आहे.’

फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की, सुशांत आणि सारा एकत्र बसलेले आहेत. टेबलवर रेडबू आणि कॉफी बघावयास मिळत आहे. फोटो बघून एक गोष्ट स्पष्ट होते की, दोघे त्यांच्या चित्रपटावरूनच काही तरी चर्चा करीत असावेत. त्याचबरोबर ते या चित्रपटासाठी किती मेहनत घेत आहेत, हेदेखील यावरून स्पष्ट होते. दरम्यान, ‘केदारनाथ’ हा एक रोमॅण्टिक चित्रपट आहे. सुरुवातीला या चित्रपटाविषयी बºयाचशा अफवा पसरविण्यात आल्या होत्या. 

असे म्हटले जात होते की, सुशांतला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. कारण त्याचा ‘राब्ता’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा यशस्वी ठरला नव्हता. असो, ‘केदारनाथ’ला एकता कपूर प्रोड्यूस करीत आहे. याबाबत एकताने म्हटले होते की, ‘जेव्हा आम्ही चित्रपटाची कथा ऐकली तेव्हा मला असे वाटले की, कथेत दम आहे. सारा सुशांतच्या अपोझिट डेब्यू करीत असल्याने चित्रपट प्रेक्षकांना भावेल, यात शंका नाही. हा एक फ्रेश प्रोजेक्ट आहे,’ असेही एकता म्हणाली होती. 

Web Title: Sushant Singh Rajput and Sara Ali Khan are discussing such a matter so serious?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.