सुशांत म्हणतो, माझी कुणाशीही स्पर्धा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 11:27 IST2016-09-29T05:57:28+5:302016-09-29T11:27:28+5:30

सुशांतसिंह राजपूत याचा ‘एम एस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’ उद्या शुक्रवारी रिलीज होतोय. हा सुशांतचा पाचवा सिनेमा आहे आणि ...

Sushant says, I have no competition with anyone | सुशांत म्हणतो, माझी कुणाशीही स्पर्धा नाही

सुशांत म्हणतो, माझी कुणाशीही स्पर्धा नाही

शांतसिंह राजपूत याचा ‘एम एस धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’ उद्या शुक्रवारी रिलीज होतोय. हा सुशांतचा पाचवा सिनेमा आहे आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तो प्रथमच बायोपिकमध्ये दिसणार आहे. ‘कॅप्टन कूल’ महेन्द्र सिंग धोनी याच्या आयुष्यावर बेतलेल्या या बायोपिकसाठी सुशांतने बराच घाम गाळलाय. २०१३ मध्ये ‘काय पोचे’ या सिनेमाद्वारे सुशांतने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. आजघडीला सुशांत बॉलिवूडचा मोस्ट डिमांडिंग स्टार झालाय. पण त्याचवेळी त्याची स्पर्धाही वाढली आहे. वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, रणवीर सिंह यांच्यासोबत सुशांतची स्पर्धा आहे. या स्पर्धेबाबत स्वत: सुशांतला काय वाटते? तर काहीच नाही. माझी कुणाशीही स्पर्धा नाही. मला जो चित्रपट करावासा वाटतो, तो मी करतो. माझी कुणाशीही कुठलीही स्पर्धा नाही, असे सुशांत म्हणतो.

Web Title: Sushant says, I have no competition with anyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.