सुशांतच्या अनोख्या टॅलेंटवरून बहीण श्वेताने उठवला पडदा, व्हिडीओ पाहून अवाक् झाले फॅन्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 11:26 AM2020-09-01T11:26:03+5:302020-09-01T11:30:03+5:30

आता त्याची बहीण श्वेता किर्तीने त्याच्या आणखी एका खासियतवरून पडदा उठवलाय. ती बाब म्हणजे सुशांत हा दोन्ही हातांनी मिरर रायटिंग फारच शानदार पद्धतीने करत होता. यासंबंधी एक व्हिडीओ श्वेताने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. 

Sushant could do mirror writing with both hands, special video shared by sister Shweta! | सुशांतच्या अनोख्या टॅलेंटवरून बहीण श्वेताने उठवला पडदा, व्हिडीओ पाहून अवाक् झाले फॅन्स!

सुशांतच्या अनोख्या टॅलेंटवरून बहीण श्वेताने उठवला पडदा, व्हिडीओ पाहून अवाक् झाले फॅन्स!

googlenewsNext

सुशांत सिंह राजपूतने आपल्या कामाने लोकांच्या मनात जागा मिळवली होती. लोकांची मनं जिंकण्यात त्याने कोणतीही कसर सोडली नव्हती. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतच्या प्रवासात त्याने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. सुशांत हा मल्टिटॅलेंटेड कलाकार म्हणून लोकप्रिय होता. आता त्याची बहीण श्वेता किर्तीने त्याच्या आणखी एका खासियतवरून पडदा उठवलाय. ती बाब म्हणजे सुशांत हा दोन्ही हातांनी मिरर रायटिंग फारच शानदार पद्धतीने करत होता. यासंबंधी एक व्हिडीओ श्वेताने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. 

श्वेता सिंह किर्तीने शेअर केलेला सुशांतच्या अनोख्या टॅलेंटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सोबतच यावर त्याचे फॅन्स भरभरून कमेंट करत आहेत. या व्हिडीओत सुशांत दोन्ही हातांनी एकसारखं लिहिताना दिसतोय. हे करत असताना त्याचा हात जराही थांबत नाहीय. सुशांतच्या या फार लोकांना माहीत नसलेल्या खासियतचं लोकांकडून भरभरून कौतुक केलं जात आहे. हा व्हिडीओ शेअर करताना श्वेताने लिहिले की, 'Rare Genius... ❤️ambidexterity-mirror writing, less than 1%population in world is capable of doing this!!'. 

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या केसचा तपास सीबीआयकडून वेगाने सुरू आहे. सुशांत गेल्या १४ जून रोजी त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला होता. त्याने ३४ वर्षीच हे जग सोडलं. त्याच्या जाण्याने केवळ त्याच्या फॅन्सनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनाही धक्का बसला आहे.  

तसेच अनेक शंका निर्माण झाल्याने त्याच्या मृत्यूचा तपास सीबीआयने करावा अशी मागणीही फॅन्ससोबतच अनेक बॉलिवूड कलाकारांनीही केली होती. आता या केसचा तपास सीबीआय करत असून अनेक वेगवेगळे धारेदोरे त्यांच्या हाती लागत आहेत. लवकरच त्याच्या मृत्यूचं सत्य सर्वांसमोर येईल असं चित्र आहे.

हे पण वाचा :

सीबीआयची सुशांतच्या बहिणीकडे चौकशी, 8 ते 13 जूनपर्यंतचा जाणून घेतला घटनाक्रम

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

सुशांतला बिझी ठेवण्यासाठी रिया चक्रवर्ती वरचेवर ठेवायची पार्टी, सॅम्युअल मिरांडाचा सीबीआयसमोर खुलासा

Web Title: Sushant could do mirror writing with both hands, special video shared by sister Shweta!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.