सुशांत बनणार निर्माता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 18:00 IST2016-11-15T18:00:37+5:302016-11-15T18:00:37+5:30

चित्रपटात अभिनय करून कंटाळलेला कलाकार त्याच्या करिअरच्या शेवटी निर्माता बनतो, असा समज आहे. मात्र, ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ चा मुख्य ...

Sushant to become producer? | सुशांत बनणार निर्माता?

सुशांत बनणार निर्माता?

त्रपटात अभिनय करून कंटाळलेला कलाकार त्याच्या करिअरच्या शेवटी निर्माता बनतो, असा समज आहे. मात्र, ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ चा मुख्य अभिनेता सुशांतसिंग राजपूत मात्र आत्ताच निर्माता होण्याच्या तयारीत आहे. त्याला म्हणे, कमी बजेटच्या एका उत्कृष्ट शॉर्ट फिल्म्सचा निर्माता व्हायचे आहे. यासाठीही त्याने एक अट ठेवल्याचे कळतेय, तो सर्वप्रथम स्क्रिप्ट वाचणार, त्याला  कथानक आवडले तरच तो त्या शॉर्ट फिल्मचा निर्माता होणार. 

भारतीय क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याच्या आयुष्यावर आधारित ‘एम.एस.धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या बायोपिकमधील सुशांतने साकारलेल्या धोनीच्या भूमिकेचे चाहत्यांकडून कौतुक झाले. चित्रपटाने बॉक्स आॅफीसवरही रेकॉर्डब्रेक कमाई केली. कौतुक आणि यशाची नशा उतरत नाही, तोच सुशांतने निर्माता होण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या या निर्णयाविषयी विचारण्यात आले असता तो म्हणाला,‘चित्रपट बनवायचा म्हटल्यास पैसा भरपूर खर्च करावा लागतो. अनेकांकडे पैसा नसल्याने त्यांच्या चांगल्या स्क्रिप्टना न्याय मिळत नाही. माझ्याकडे पैसा आहे म्हणून मला वाटते की, ज्यांची पैशांमुळे कुचंबना होते त्यांना मी स्क्रिप्ट आवडली तर नक्कीच मदत करू इच्छितो. शेवटी व्यक्तीच्या आयुष्यात पैसा सर्वांत जास्त महत्त्वाचा असतो. मग तुम्ही अभिनय करा किंवा चित्रपटनिर्मिती..’ 

‘ब्योमकेश बॅनर्जी’,‘शुद्ध देसी रोमांस’,‘काय पोचे’,‘पीके’ चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय साकारणारा सुशांतसिंग राजपूत निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवतोय म्हटल्यावर दर्जेदार चित्रपटांची निर्मिती अपेक्षित आहे. अनुष्का शर्मा  ‘फिल्लोरी’ चित्रपटाच्या माध्यमातून निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवत आहे. हे दोन गुणी कलाकार निर्माता होणार म्हटल्यावर चांगल्या कथानकावर आधारित चित्रपटांची वर्णी भविष्यात लागणार, अशी अपेक्षा ठेवल्यास वावगे ठरणार नाही. 

Web Title: Sushant to become producer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.