"सर्जरीचं दुकान", मौनी रॉयचा बदललेला चेहरा पाहून चाहत्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 14:27 IST2025-03-29T14:26:28+5:302025-03-29T14:27:51+5:30

Mouni Roy : अभिनेत्री मौनी रॉयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक अंदाज लावत आहेत की, अभिनेत्रीने पुन्हा शस्त्रक्रिया केली आहे.

''Surgery shop'', fans trolled Mouni Roy after seeing her changed face | "सर्जरीचं दुकान", मौनी रॉयचा बदललेला चेहरा पाहून चाहत्यांनी केलं ट्रोल

"सर्जरीचं दुकान", मौनी रॉयचा बदललेला चेहरा पाहून चाहत्यांनी केलं ट्रोल

हल्ली सुंदर दिसण्यासाठी विविध ट्रिटमेंट आणि सर्जरीचा आधार घेतला जातो. त्यात कलाकार तर सऱ्हास बोटोक्स आणि सर्जरी करताना दिसतात. अनेकदा या सर्जरींमुळे ते सुंदर दिसण्याऐवजी विचित्र दिसू लागतात आणि ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात. असंच काहीसं अभिनेत्री मौनी रॉयच्या बाबतीत घडलं आहे. अभिनेत्री मौनी रॉय(Mouni Roy)चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक अंदाज लावत आहेत की, अभिनेत्रीने पुन्हा शस्त्रक्रिया केली आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मौनीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे

मौनी रॉयने इंडस्ट्रीतील नामांकित सेलिब्रिटींमध्ये स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून आल्यानंतर बॉलिवूडमध्ये करिअर करणे सोपी बाब नाही. याशिवाय मौनी तिच्या आउटफिट्स आणि स्टाइलमुळेही चर्चेत असते. आता तिच्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मौनी वन पीसमध्ये दिसत आहे. या व्हिडीओत तिचा लूक खूप बदललेला दिसत आहे. काहींना तिची स्टाईल खूप आवडली, तर काहींनी मौनीला पुन्हा सर्जरी केली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.


एका युजरने व्हिडीओवर कमेंट केली की, 'ही क्यूट आहे'. दुसऱ्याने कमेंट केली की, 'सर्जरीचं दुकान. संपूर्ण चेहऱ्याचे डिझाईन बनवलं आहे, जसे मुलं चित्र काढतात, त्याचप्रमाणे डॉक्टरांनीही काही कलात्मकता केली आहे.' आणखी एका युजरने लिहिले, 'चेहरा पुन्हा बदलला.' दुसऱ्या यूजरने लिहिले - 'सर्जरी करुन करुन वाट लावली, ओळखतापण येत नाही. किती क्युट असेल? या कार्यक्रमात मौनीसोबत सोनम बाजवा आणि दिशा पटानीही पाहायला मिळाली. मौनी आणि दिशा खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि दोघींना अनेकदा एकत्र पाहण्यात आले आहे.

वर्कफ्रंट

मौनी रॉय द भूतनीमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत संजय दत्त, सनी सिंग, पलक तिवारी आणि निक देखील दिसणार आहेत. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे जो १८ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात टीव्ही शो 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'मधून केली होती. यानंतर ती इतर अनेक मालिकांमध्ये दिसली पण तिला सर्वाधिक लोकप्रियता एकता कपूरच्या नागिन या शोमधून मिळाली.
 

Web Title: ''Surgery shop'', fans trolled Mouni Roy after seeing her changed face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.