'माझ्या मुलीला...', जिया खानच्या आईच्या गंभीर आरोपानंतर सूरज पांचोली पुन्हा अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 04:11 PM2022-08-18T16:11:52+5:302022-08-18T16:12:38+5:30

Jiah khan Mother on Suicide Case: जियाच्या आईने अभिनेता सूरज पांचोलीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ज्याची बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली असून सूरज पांचोली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Suraj Pancholi again in trouble after Jiah Khan's mother's serious allegations on him | 'माझ्या मुलीला...', जिया खानच्या आईच्या गंभीर आरोपानंतर सूरज पांचोली पुन्हा अडचणीत

'माझ्या मुलीला...', जिया खानच्या आईच्या गंभीर आरोपानंतर सूरज पांचोली पुन्हा अडचणीत

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री जिया खान(Jiah khan)चे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, तेही तिच्या आईमुळे. अभिनेत्री जिया खानने ३ जून २०१३ रोजी या जगाचा निरोप घेतला होता. मृत्यू झाल्यापासून ती चर्चेत राहिली आहे. आता या प्रकरणात जिया खानची आई कोर्टात असे काही बोलले आहे, ज्यानंतर सर्वांनाच जियाच्या आत्महत्येचा संशय येऊ लागला आहे. जियाच्या आईने अभिनेता सूरज पांचोली(Suraj Pancholi)वर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ज्याची बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा सुरू असून सूरज पांचोली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
जिया खानने ३ जून २०१३ रोजी वयाच्या २५ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. जिया मुंबईतील तिच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्या मानलं जात होतं, नंतर जसजसा वेळ निघून गेला तसतसा खुलासा झाला. याप्रकरणी सूरजलाही एकदा अटक करण्यात आली आहे.

नुकतेच जियाच्या आईलाही कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आला होता. यानंतर जिया खानची आई राबिया खान कोर्टात हजर झाली. तिथे तिने अनेक मोठे खुलासे केले. तिने न्यायालयात सांगितले की, सूरज तिची मुलगी जिया खानचा मानसिक आणि शारीरिक छळ करत असे, त्यामुळे ती अस्वस्थ झाली. जियाच्या आईने पुढे सांगितले की, सूरज पांचोली त्याच्या मित्रांसमोर माझ्या मुलीचा अपमान करायचा, जियासोबत रिलेशनशीपमध्ये असतानाही तो इतर मुलींसोबत फ्लर्ट करायचा. 


जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी सूरज पांचोलीला अटक झाली आली असून, तो सध्या जामिनावर बाहेर आहे. सूरज आणि जिया यांची भेट २०१२ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती.

Web Title: Suraj Pancholi again in trouble after Jiah Khan's mother's serious allegations on him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.