जेएनयूमध्ये घडलेले सुपरस्टार्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 00:10 IST2016-02-20T09:10:35+5:302016-02-21T00:10:09+5:30
दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) सध्या वादाच्या भोवºयात आहे. काहीजण येथे शिकणाºयांना देशद्रोही असल्याचा ठपका लावत आहेत, तर ...

जेएनयूमध्ये घडलेले सुपरस्टार्स
आपल्या आगामी ‘फॅन’ या चित्रपटातील गाण्याच्या लॉँचिंगसाठी दिल्लीला गेलेले शाहरुख खानला 28 वर्षा अगोेदर ‘जेएनयू’तर्फेच डिग्री देण्यात आली आहे. बादशाह खानने दिल्लीच्या हंसराज कॉलेज मध्ये शिक्षण घेतले होते. याच कॉलेजमधून त्यांना ही डिग्री देण्यात आली हे येथे विशेष.
शाहरुख खान व्यतिरिक्त बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनदेखील जेएनयूचे विद्यार्थी आहेत. आपल्या करिअरला सुरू करण्याअगोदर अमिताभ बच्चनने करोड़ीमल कॉलेज मधून पदवी घेतली होती, तर 1993 मध्ये अर्जुन रामपालने हिंदु कालेज मधून बॅचलरची डिग्री मिळविली आहे. तो देखील जएनयूचा विद्यार्थी आहे.
कोंकणा सेन शर्माचे जेएनयूशी नाते आहे. कोंकणा शर्माने 2001 मध्ये सेंट स्टीफन कॉलेजमधून इंग्लिश लिट्रेचरची डिग्री प्राप्त केली होती. आगामी येणाºया आपल्या ‘अलीगढ़’ चित्रपटाच्या प्रमोशनात व्यस्त असलेले मनोज वाजपेयी 1989 पर्यंत रामजस कॉलेजचे विद्यार्थी होते आणि त्यांनी इतिहास विषयाता डिग्री मिळविली होती.
मल्लिका शेरावत मिरांडा कॉलेजची विद्यार्थीनी होती. याच कॉलेज मध्ये नंदिता दास, मीरा नायर आणि मनिषा लांबा यांनी देखील शिक्षण घेतले आहे. ‘जब वी मीट’ पासून ते ‘तमाशा’ बनविणारे निर्देशक इम्तियाज अली 1993 पर्यंत हिंदु कॉलेजचे विद्यार्थी होते, तर नेहा धूपियाने मैरी कॉलेज मध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
आमिर खान आणि शाहरुख खानच्या विरोधातील आक्रोशा नंतर आता बॉलिवूड स्टार राजकीय घटनाक्रमावर प्रतिक्रिया देणे टाळू लागले आहेत, मात्र जेएनयूशी जुळलेले या सिताºयांना सध्याच्या घटनेमुळे आपल्या गत दिवसांची आठवण नक्की येत असेल.