सुपरस्टार सलमान खान आहे ‘चाईल्ड लव्हर’... विश्वास बसत नाही मग पाहा हे त्याचे फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 13:10 IST2017-09-27T07:40:05+5:302017-09-27T13:10:05+5:30

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याला आपण एक सुपरस्टारसोबतच एक ‘चाईल्ड लव्हर’ म्हणून  देखील ओळखतो. त्याला लहान मुलांसोबत मस्ती करणं, ...

The superstar Salman Khan is 'Child Lover' ... not sure if he can see his photos ... | सुपरस्टार सलमान खान आहे ‘चाईल्ड लव्हर’... विश्वास बसत नाही मग पाहा हे त्याचे फोटो...

सुपरस्टार सलमान खान आहे ‘चाईल्ड लव्हर’... विश्वास बसत नाही मग पाहा हे त्याचे फोटो...

लिवूडचा भाईजान सलमान खान याला आपण एक सुपरस्टारसोबतच एक ‘चाईल्ड लव्हर’ म्हणून  देखील ओळखतो. त्याला लहान मुलांसोबत मस्ती करणं, फोटो काढणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं प्रचंड आवडतं. आता हेच पाहा ना, त्याचा भाचा अहिल शर्मासोबत त्याचं खूप चांगलं ट्यूनिंग आहे. त्याच्या मित्रांची लहान मुलंही तो चांगल्याप्रकारे खेळवतो. एवढंच नाही तर तो चित्रपटाच्या सेटवर देखील लहान मुलांसोबत चांगला रमलेला दिसतो. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मग पाहा हे काही फोटो...
           

अहिलसोबत सल्लूमियाँचा क्वालिटी टाइम...
सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा या दोघांचा मुलगा म्हणजे अहिल शर्मा. सलमान खानला त्याचा भाचा अहिल सोबत वेळ घालवायला प्रचंड आवडतं. अर्पिता गरोदर असल्यापासून सलमान तिची काळजी घेत असायचा. अर्पिताची डिलीव्हरी होत असताना सलमान काश्मिरमध्ये चित्रपटाची शूटिंग करत होता. तिला जेव्हा कळालं की, मुलगा झाला आहे तेव्हा तो शूटिंगमधून वेळ काढून तिला भेटण्यासाठी आला. 

       

चित्रपटाच्या सेटवर शाळेच्या लहान मुलांसोबत भाईजान...
सलमान खान कुठेही गेला तरी तो लहान मुलांसोबत रमलेला आपल्याला दिसतो. त्याचा अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘सुल्तान’ चित्रपटाच्या सेटवर तो काही शाळांच्या मुलांसोबत बोलताना दिसला. त्याने हाच फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. 

          

‘ट्यूबलाईट’चा को-स्टार मॅटिन रे तंगू या चीनी मुलासोबत भाई...
सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर फार काही विशेष कमाई क रू शकला नाही. पण, तो गॉसिपमुळे चर्चेत आला. यात सलमानने त्याचा छोटा सहकारी मॅटिन रे तंगूसोबत बरेचसे फोटो काढले. छोट्या मुलाच्या भूमिकेसाठी त्याची १००० लहान मुलांमधून निवड करण्यात आली होती. सलमानने त्याच्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

       

बालदिनाच्या दिवशी मुलांसोबत सल्लूमियाँ...

सलमान खान हा असा अभिनेता आहे ज्याच्यावर सर्व स्तरांतील फॅन्स प्रेम करतात. त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात तो लहान मुलांसोबत मस्त धम्माल करताना दिसतो आहे. त्यासोबतच एका फोटोत तो काश्मिरी मुलांसोबतही दिसतो आहे. शूटिंगदरम्यान त्याला जसा वेळ  मिळाला तसा तो त्यांच्यासोबत गप्पा-टप्पा मारतो.

      
 

Web Title: The superstar Salman Khan is 'Child Lover' ... not sure if he can see his photos ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.