श्रीदेवींच्या आईच्या पसंतीस उतरलेला 'हा' अभिनेता; मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवताच थेट दिलेला नकार, काय होतं कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:21 IST2025-11-11T11:06:01+5:302025-11-11T11:21:35+5:30
श्रीदेवींच्या आईने 'या' सुपरस्टारला मुलीच्या लग्नासाठी घातलेली मागणी; पण, अभिनेत्याने दिलेला नकार, म्हणालेले...

श्रीदेवींच्या आईच्या पसंतीस उतरलेला 'हा' अभिनेता; मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवताच थेट दिलेला नकार, काय होतं कारण?
Sridevi: बॉलिवूडच्या पहिल्या महिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात नेहमीच ताज्या राहतील.हिंदीसह त्यांनी तेलुगु,तमिळ, कन्नड, मल्याळम अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. नगीना, सुहागन, जुदाई,लाडला अशा अनेक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारून त्यांना लोकप्रियता मिळाली.इतकंच नाही त्यांची केवळ एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतं. पडद्यावर श्रीदेवी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक स्टार्ससोबत काम केलं. मात्र, खऱ्या आयुष्यात त्यांची जोडी बोनी कपूर यांच्यासोबत जमली.
प्रसिद्धीच्या शिखरावर असताना श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. मात्र, तुम्हाला माहितीये बोनी कपूर यांच्याशी लग्न करण्यापूर्वी त्यांच्या आईने एका सुपरस्टार अभिनेत्याकडे लेकीच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला होता. पण त्याने स्पष्टपणे नकार दिला. लेक श्रीदेवी आणि या अभिनेत्याने लग्न करावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र, त्याचं ते स्वप्न सत्यात उतरलं नाही. या अभिनेते दुसरे तिसरे कोणी नसून कमल हासन होते.
२०१८ मध्ये श्रीदेवी यांच्या आईच्या निधनानंतर अभिनेते कमल हसन यांनी याबद्दल सांगितलं होतं की, ते आणि श्रीदेवी एकमेकांच्या खूप जवळ होते. श्रीदेवींची आई वारंवार कमल हसन यांना श्रीदेवी यांच्याशी लग्न करण्यासाठी विचारत होत्या. पण प्रत्येक वेळी त्यांनी नकार दिला.
काय होतं कारण?
कमल हसन म्हणाले होते की,"श्रीदेवींची आई आणि मी अनेकदा श्रीदेवीच्या लग्नाबाबत बोलायचो. तेव्हा त्या मला गंमतीने माझ्या मुलीशी लग्न कर म्हणायच्या. मी हसून म्हणायचो की असं झालं तर मी आणि श्रीदेवी एकमेकांना वेडे बनवू आणि मग दुसऱ्या दिवशी मला तिला घरी परत पाठवावे लागेल."
साऊथ चित्रपटांप्रमाणेच कमल हासन यांनी बॉलिवूडही गाजवलंय. त्यांनी श्रीदेवींसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पडद्यावर या जोडीला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली होती.