​फरहान अख्तर आणि अधुना भाबनी अख्तर यांचा सुपर फ्रेंडली घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 15:11 IST2017-03-07T09:41:37+5:302017-03-07T15:11:37+5:30

कोणताही घटस्फोट म्हटला की, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जातात. काही तक्रारी मांडल्या जातात. पण फरहान अख्तर आणि अधुना ...

Super-friendly divorce of Farhan Akhtar and Adhuna Bhabani Akhtar | ​फरहान अख्तर आणि अधुना भाबनी अख्तर यांचा सुपर फ्रेंडली घटस्फोट

​फरहान अख्तर आणि अधुना भाबनी अख्तर यांचा सुपर फ्रेंडली घटस्फोट

णताही घटस्फोट म्हटला की, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जातात. काही तक्रारी मांडल्या जातात. पण फरहान अख्तर आणि अधुना भाबनी अख्तरच्या घटस्फोट प्रक्रियेत असे काहीच ऐकायला मिळत नाहीये. ते दोघे नुकतेच वांद्रे कोर्टात काऊन्सिलिंग सेक्शनसाठी आले होते. त्यावेळी त्या दोघांनी एकमेकांविषयी काहीही बोलण्यास नकार दिला असे म्हटले जात आहे. 
फरहान आणि अधुनाने घटस्फोटाचा अर्ज दाखल करून कित्येक महिने झाले असले तरी त्या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय का घेतला, घटस्फोटाचे कारण काय होते हे अद्याप आपल्या वकिलांना सांगितलेले नाहीये. कोणत्याही घटस्फोटात आपल्या जोडीदाराबाबत काय तक्रारी आहेत हे हमखास वकिलाला सांगितल्या जातात. यातूनच जोडीदाराविरुद्ध केस वकील बनवतो. पण फरहान आणि अधुना या दोघांनीही अशा काहीच तक्रारी केलेल्या नाहीत. फरहान आणि अधुनाच्या नात्यात नक्कीच काहीतरी समस्या असेल त्यामुळेच त्यांनी इतक्या वर्षांच्या लग्नानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पण ही समस्या काय आहे हे त्या दोघांनीही वकिलांनादेखील सांगितली नाही. केवळ आमच्यातील नाते संपले आहे. आम्ही एकमेकांसाठी योग्य नाही आहोत असे सांगत त्यांनी घटस्फोटाची मागणी केली. 
फरहान आणि अधुना गेल्या कित्येक महिन्यांपासून वेगळे राहात आहेत. त्यांना वेगळे होऊन एप्रिल महिन्यात सहा महिने पूर्ण होणार आहेत. त्यानंतर त्यांना कायदेशीर घटस्फोट मिळेल. घटस्फोट झाल्यानंतर त्या दोघांच्या नावावर असलेला बंगला अधुनाकडे जाणार आहे. तसेच फरहान तिला काही लाखांमध्ये अॅलिमनी देणार असून त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी तो वेगळे पैसे देणार असल्याचे म्हटले जात आहे.   



Web Title: Super-friendly divorce of Farhan Akhtar and Adhuna Bhabani Akhtar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.