super excited !! पाहा, ‘बाहुबली2’च्या ट्रेलरची एक झलक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2017 14:53 IST2017-03-13T09:23:45+5:302017-03-13T14:53:45+5:30
धर्मा प्रॉडक्शनने बहुप्रतीक्षीत ‘बाहुबली2’ या चित्रपटाच्या ट्रेलरची एक छोटीशी झलक सादर केलीय. ‘बाहुबली2’ची ही शानदार झलक पाहून तुमची एक्साईटमेंट वाढल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की.
.jpg)
super excited !! पाहा, ‘बाहुबली2’च्या ट्रेलरची एक झलक!
स ळे जण होळीच्या रंगात न्हाले असताना, करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मात्र नेमके होळीचे मुहूर्त साधले आहे. होय, कशासाठी? तर तुम्हा-आम्हाला एक सुपर एक्साईटींग न्यूज द्यायला. ही न्यूज काय, हे जाणून घ्यायला तुम्हीही उत्सूक असाल, तर ऐका... धर्मा प्रॉडक्शनने बहुप्रतीक्षीत ‘बाहुबली2’ या चित्रपटाच्या ट्रेलरची एक छोटीशी झलक सादर केलीय. ‘बाहुबली2’ची ही शानदार झलक पाहून तुमची एक्साईटमेंट वाढल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की.
{{{{twitter_video_id####
धर्मा प्रॉडक्शनच्या ट्विटर अकाऊंटवर ‘बाहुबली2’ची एक झलक दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे ट्रेलर येत्या १६ मार्चला सकाळी ९ वाजता रिलीज होणार आहे.
सध्या सगळीकडे ‘बाहुबली2’चीच चर्चा आहे़ प्रत्येकजण ‘बाहुबली2’ पाहण्यास उत्सूक आहे. हा चित्रपट येत्या २८ एप्रिल रोजी रिलीज होतो आहे. याच दिवशी ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ या यक्षप्रश्नाचे उत्तरही मिळणार आहे.
जेव्हापासून ‘बाहुबली2’ची रिलीज डेट जाहिर झालीय, तेव्हापासून बॉक्सआॅफिसवर खळबळ माजली आहे. या चित्रपटाचे थिएटर राईट्स अव्वाच्या सव्वा किंमत देऊन खरेदी केले गेले आहेत. केरळमध्ये १०़५० कोटी, तामिळनाडूत ४५ कोटी तर आंध्र व तेलंगणात सुमारे १०० कोटींना हे अधिकार विकले जाणार आहेत. ‘बाहुबली2’च्या हिंदी व्हर्जनचे अधिकार १२० कोटी रुपए मोजून खरेदी करण्यात आले आहेत. म्हणजेच काय तर रिलीजपूर्वी चित्रपटाने ३५० कोटी रुपए कमावले आहेत.
काही दिवसांपूर्वी ‘बाहुबली2’चे मोशन पोस्टर आऊट झाले होते. विशेष म्हणजे, रिलीज होताच या मोशन पोस्टरवर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्या होत्या. हे मोशल पोस्टर यु ट्यूबवर पाचव्या क्रमांकावर ट्रेंड करत होते. कालच दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी ‘बाहुबली2’चे नवे पोस्टर रिलीज केले. या पोस्टरचे दोन भाग असून, वरच्या भागात कटप्पा अमेरेंद्र बाहुबलीला हातात घेऊन खेळवताना दिसत आहे, तर खालच्या भागात कटप्पा बाहुबलीला तलवारने मारताना दिसत आहे.
२०१५ मध्ये आलेल्या ‘बाहुबली’ने धुमाकूळ घालत बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक १०० कोटीहून अधिकची कमाई केली होती. ‘बाहुबली: दी बिगीनिंग’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा प्रभास असो वा खलनायकाची भूमिका साकारणारा राणा डग्गुबती, या सगळ्यांनीच या चित्रपटाद्वारे अपार लोकप्रीयता मिळवली. आता प्रभाव व राणाला ‘बाहुबली2’मध्ये पाहण्यास लोक उत्सूक आहेत.
{{{{twitter_video_id####
}}}}A glimpse into the world of #Baahubali2, trailer out on 16th March! @karanjohar@BaahubaliMovie@ssrajamouli@Shobu_@RanaDaggubatipic.twitter.com/fEyRhKtvzj— Dharma Productions (@DharmaMovies) March 13, 2017