सनी लिओनी मुलगी निशा अन् पती डेनियल वेबरसोबत झाली स्पॉट, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 21:09 IST2017-09-13T15:34:03+5:302017-09-13T21:09:16+5:30

सनी लिओनी नुकतीच मुलगी निशा आणि पती डेनियल वेबरसोबत स्पॉट झाली. यावेळी निशा डॅडी डेनियलच्या कडेवर होती. तिने डेनिम ...

Sunny Leoni girl Nisha and husband Daniel Weber spotted, see photos! | सनी लिओनी मुलगी निशा अन् पती डेनियल वेबरसोबत झाली स्पॉट, पहा फोटो!

सनी लिओनी मुलगी निशा अन् पती डेनियल वेबरसोबत झाली स्पॉट, पहा फोटो!

ी लिओनी नुकतीच मुलगी निशा आणि पती डेनियल वेबरसोबत स्पॉट झाली. यावेळी निशा डॅडी डेनियलच्या कडेवर होती. तिने डेनिम टॉप आणि पिंक कलरचा लेगिंग घातला होता. यावेळी डेनियल माध्यमांच्या कॅमेºयापासून आपल्या चिमुकलीचा चेहरा लपविण्याचा प्रयत्न करीत होता. तर सनी त्याला लवकर निघण्याची घाई करीत होती. सनी नुकतीच मुलगी आणि पतीसोबत दिल्लीहून परतली आहे. त्याठिकाणी ती तिचा अपकमिंग ट्रेक ‘तेरा इंतजार’च्या प्रमोशनसाठी गेली होती. तेथून परताना सनी आपल्या परिवारासोबत बघावयास मिळाली. 





सनीने आणि डेनियलने जुलै २०१७ मध्ये लातूर जिल्ह्यातून २१ महिन्याच्या निशाला दत्तक घेतले. आता ती २२ महिन्याची झाली आहे. महाराष्टÑातील असलेल्या या चिमुकलीचे नाव सनीनेच निशा असे ठेवले आहे. रिपोर्टनुसार ज्या मुलीला सनीने दत्तक घेतले आहे, त्या मुलीला जवळपास ११ दाम्पत्यांनी दत्तक घेण्यास नकार दिला होता. त्याचे मुख्य कारण तिचा सावळा रंग असल्याचेही बोलले जाते. मात्र सनी आणि डेनियलने या मुलीला दत्तक घेतले आहे. याकरीता या दाम्पत्याला तब्बल ९ महिन्याच्या प्रोसेसचा सामना करावा लागला आहे. 





सनीने अन्य परिवाराप्रमाणेच सर्व प्रक्रिया पुर्ण केल्यानंतरच निशाला दत्तक घेतले आहे. सनीने ३० सप्टेंबर २०१६ रोजी सीएआरएच्या वेब पोर्टलच्या माध्यमातून मुल दत्तक घेण्यासाठी अर्ज सादर केला होता. तब्बल ९ महिने चाललेल्या या प्रकियेनंतर २१ जून २०१७ रोजी निशा सनीच्या कुशीत आली. सध्या हे दाम्पत्य निशाला दत्तक घेतल्यामुळे आनंदी आहे. काही दिवसांपूर्वीच सनीने खुलासा केला होता की, निशा या जगातील सर्वात सुंदर मुलगी असून, तिच्यामुळे माझे आयुष्य बदलून गेले आहे. 



त्याचबरोबर सनीने आयुष्यात पुढे जाताना काय करावे, कुठले क्षेत्र निवडवावे याविषयीचे आम्ही तिला पुर्ण स्वातंत्र देणार असल्याचेही सनीने सांगितले होते. सध्या सनी आपल्या प्रोजेक्टबरोबरच मुलीच्या पालनपोषणाकडेही लक्ष देत आहे. जेव्हा सनी आणि डेनियलने निशाला दत्तक घेतले तेव्हा इंडस्ट्रीमधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. 

Web Title: Sunny Leoni girl Nisha and husband Daniel Weber spotted, see photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.