सनी लिओनच्या ‘लैला ओ लैला मुळे झिनत अमान आनंदी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 16:04 IST2016-12-25T16:04:54+5:302016-12-25T16:04:54+5:30
Glad that my song Laila O Laila was remixed: Zeenat Aman; झिनत अमान हिची भूमिका असलेल्या ‘कुरबानी’ या चित्रपटातील ‘लैला ओ लैला’ हे गाणे त्याकाळी चांगलेच हिट ठरले होते. आजही या गाण्याचे अनेक चाहते आहेत. या गाण्याचा रिमेक शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटात करण्यात आला आहे.
.jpg)
सनी लिओनच्या ‘लैला ओ लैला मुळे झिनत अमान आनंदी!
ज्येष्ठ अभिनेत्री झिनत अमान हिची भूमिका असलेल्या ‘कुरबानी’ या चित्रपटातील ‘लैला ओ लैला’ हे गाणे त्याकाळी चांगलेच हिट ठरले होते. आजही या गाण्याचे अनेक चाहते आहेत. या गाण्याचा रिमेक शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटात करण्यात आला आहे. हे गाणे हिट ठरल्याने झिनत अमान आनंदी असून ती म्हणाली, नव्या पिढीला जुण्या गाण्याची ओळख नव्या चित्रपटात वापरल्या जाणाºया रिमिक्समधून होत आहे. यामुळे नव्या पिढीतील तरुणांना त्या काळातील गाणी कशी होती याची माहिती मिळत आहे. नव्या पिढीला ही संधी मिळाली आहे.
लैला ओ लैला हे झिनत अमानवर चित्रित करण्यात आलेले दुसरे रिमिक्स व्हर्जन आहे. यापूर्वी देव आनंद सोबतच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील ‘दम मारो दम’ हे गाणे दीपिका पादुकोणवर याच नावाच्या चित्रपटात रिमिक्स करण्यात आले होते होते.
‘रईस’चा ट्रेलर रिलीजमध्ये सनी लिओन दिसल्याने यात तिने आयटम नंबर केला असेल असा अंदाज लावण्यात येत होता. दरम्यान ख्रिसमस व न्यू ईअर पार्टीसाठी एका हॉटेलने सनी लिओनला यातील गाण्यावर लाईव्ह परफार्मन्स करण्यासाठी तब्बल चार कोटी रुपयांची आॅफर दिल्याची चर्चा होती. मात्र २१ तारखेला हे रईसमधील बहुप्रतिक्षित गाणे रिलीज झाल्यापासून यूट्युबवर ट्रेन्ड करीत आहे.