सनी लिओनीच्या ‘बर्थ डे’ला पती डेनियलने केले रोमॅण्टिक डेटचे प्लॅनिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2017 16:40 IST2017-05-13T11:03:53+5:302017-05-13T16:40:47+5:30

बी-टाउनमधील सर्वाधिक रोमॅण्टिक कपल म्हणून सनी लिओनी आणि डेनियल बेवर यांच्याकडे बघितले जाते. कारण हे दोघेही एकमेकांवर प्रचंड प्रेम ...

Sunny Leone's 'Birthday' husband Danielle made a romantic date planning! | सनी लिओनीच्या ‘बर्थ डे’ला पती डेनियलने केले रोमॅण्टिक डेटचे प्लॅनिंग!

सनी लिओनीच्या ‘बर्थ डे’ला पती डेनियलने केले रोमॅण्टिक डेटचे प्लॅनिंग!

-टाउनमधील सर्वाधिक रोमॅण्टिक कपल म्हणून सनी लिओनी आणि डेनियल बेवर यांच्याकडे बघितले जाते. कारण हे दोघेही एकमेकांवर प्रचंड प्रेम करीत असून, नेहमीच एकमेकांना सपोर्ट करताना बघावयास मिळाले आहेत. सनीचा आज वाढदिवस असून, तिने ३५व्या वर्षात पर्दापण केले आहे. अशात सनीचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी पती डेनियल आणि तिची खास मैत्रीण अर्चना कोचर या दिवसाला स्पेशल करण्यासाठी प्लॅनिंग करीत आहेत. 

एकीकडे अर्चनाने सनीला एक स्पेशल केक भेट दिला असून, डेनियल सरप्राइज देण्यास उत्सुक आहे. डेनियलने तिच्यासाठी केवळ डेटचे प्लॅनिंग केले नसून, तिने तिच्या परिवाराला संपूर्ण वेळ द्यावा याबाबतचे नियोजन केले आहे. सूत्राने डिएनएला सांगितले की, डेनियलने त्याच ठिकाणी डिनरचे प्लॅनिंग केले आहे, ज्या ठिकाणी हे दोघे प्रथमच डेटवर गेले होते. 



त्याठिकाणचे वातावरण खूपच रोमॅण्टिक असून, त्याठिकाणी कॅबाना स्टाइलमध्ये रुम्स् आहेत. मात्र याठिकाणी हे दोघेच जाणार नसून, त्यांच्याबरोबर सनी आणि डेनियलचे आई-वडीलही उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सनीचा भाऊ आणि त्याची पत्नी व काही मित्रही या पार्टीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा दिवस सनीसाठी खूपच स्पेशल ठरण्याची शक्यता आहे. 

अभिनेता शाहरूख खान याच्या ‘रईस’ या चित्रपटात सनीने ‘लैला मैं लैला’ या आयटम सॉन्गवर आपला जलवा दाखविला होता. हे गाणे जबरदस्त हिट ठरले असून, सनीच्या माध्यमातून बॉलिवूडला आयटम गर्लही मिळाली आहे. शिवाय ती असाच काहीसा तडका लावण्यासाठी तेलगू चित्रपट ‘पीएवी गरुडा वेगा’मध्येही आयटम नंबर करताना बघावयास मिळणार आहे. नुकतेच सनीने या गाण्याच्या शूटिंगचे काही फोटोज् ट्विटरवर शेअर केले होते. 

Web Title: Sunny Leone's 'Birthday' husband Danielle made a romantic date planning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.