सनी लिओनीची वेबसाईट बंद होणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2016 16:22 IST2016-09-17T10:52:54+5:302016-09-17T16:22:54+5:30
पॉर्न चित्रपटांना सोडचिठ्ठी देत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सनी लिओनी हिला आता एका नव्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तिच्या पॉर्न ...
.jpg)
सनी लिओनीची वेबसाईट बंद होणार ?
तिच्या पॉर्न वेब साईटवर बंदी घालावी, अशी मागणी काशीमधील हिंदू जनजागृती समितीने केली आहे. तसेच ही बंदीची अमलबजावणी लवकर न झाल्यास जनजागृती मोहीम राबविली जाणार असल्याचेही समजते.
संघटनेचे नीलेश सिंग्बल याबाबत माहिती देताना म्हणाले, सनीच्या वेब साईटवरील व्हिडिओमुळे भारतीय संस्कृती आणि मूल्यांवर घाला घातला जात आहे. मुळात भारतीय लोकांना पोर्न इन्डस्ट्रीबाबत अधिक माहिती नाही. त्यामुळे सनीचे नाव इंटरनेटवर टाकून पोर्न व्हिडिओ सर्च केले जात आहेत. या सर्व गोष्टींचा परिणाम भारतीय समाजावर विघातक स्वरूपात जाणवत आहे. त्यामुळे आम्हीही बंदीची मागणी केली आहे. याबाबत जनजागृतीही केली जाणार आहे.
काशीमधील शशस्त्री घाटावरून या मोहिमेस प्रारंभ केला जाईल. भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून काशीची ओळख आहे. त्यामुळे या ठिकाणाची निवड केली गेली आहे.