सनी लिओनीचा ‘रईस’नंतर ‘भूमी’मध्ये आयटम तडका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2017 16:52 IST2017-07-25T11:22:06+5:302017-07-25T16:52:06+5:30

बॉलिवूडची हॉट अ‍ॅण्ड सेक्सी अभिनेत्री सनी लिओनी ‘रईस’मधील आयटम नंबरनंतर आगामी ‘भूमी’मध्ये आपल्या आयटमचा तडका लावणार आहे. ‘रईस’मध्ये शाहरूख ...

Sunny Leonei 'Rais' after item 'tadaka' in land! | सनी लिओनीचा ‘रईस’नंतर ‘भूमी’मध्ये आयटम तडका!

सनी लिओनीचा ‘रईस’नंतर ‘भूमी’मध्ये आयटम तडका!

लिवूडची हॉट अ‍ॅण्ड सेक्सी अभिनेत्री सनी लिओनी ‘रईस’मधील आयटम नंबरनंतर आगामी ‘भूमी’मध्ये आपल्या आयटमचा तडका लावणार आहे. ‘रईस’मध्ये शाहरूख खानसोबत सनीने लावलेले ठुमके प्रेक्षकांना चांगलेच भावले होते. ‘लैला मंै लैला’ या गाण्यावर सनीने आग लावली होती. आता असाच काहीसा जलवा ती संजय दत्तच्या आगामी ‘भूमी’ या चित्रपटात दाखविताना दिसणार आहे. सनी पुढच्या महिन्यात ‘ट्रिपी ट्रिपी’ हे आयटम नंबर शूट करणार आहे. 

या आयटमनंबरला सचिन-जीगर ही जोडी संगीत देणार आहे, तर गाण्याचे बोल प्रिया सरैया हिचे असतील. डान्सची कोरिओग्राफी गणेश आचार्य करणार आहे. सनीने एका वक्तव्यात म्हटले की, ‘मी दिग्दर्शक उमंग कुमार आणि गणेशबरोबर या आयटमनंबरसाठी काम करीत आहे. यासाठीची रिहर्सल गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. नियमाचे कठोर पालन करणारा डान्स प्रशिक्षक गणेशने मला नुकतेच काही कठीण स्टेप दिल्या आहेत. या स्टेप चांगल्या पद्धतीने करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. 

पुढे बोलताना सनीने म्हटले की, गाण्याचे संगीत खूपच चांगले असून, युवा प्रेक्षकांना ते भावेल याची मला खात्री आहे. हा चित्रपट २७ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. संजय दत्त याची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बाप-मुलीच्या नात्यावर आधारित आहे. कारागृहातून शिक्षा भोगून आल्यानंतर संजूबाबाचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजूबाबा बºयाचदा भावुक झाल्याचे आपल्याला बघावयास मिळाले होते. 

दरम्यान, सनीने यापूर्वी किंग खान शाहरूखसोबत आयटमनंबर करून धूम उडवून दिली होती. तिच्या ‘लैला मैं लैला’ला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दिली होती. पुढे अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये सनीने या आयटमनंबरवर परफॉर्मन्स करून आग लावली होती. आता पुन्हा एकदा सनी अशाच काहीशा अंदाजात बघावयास मिळणार आहे. सनीचा हा आयटम नंबर प्रेक्षकांना कितपत भावेल हे येत्या काळात स्पष्ट होईलच. 

Web Title: Sunny Leonei 'Rais' after item 'tadaka' in land!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.