Sunny Leone New song: 'मधुबन में राधिका नाचे' गाण्यात सनी लिओनीला पाहून भडकले यूजर्स, गाणं बॅन करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 12:08 PM2021-12-23T12:08:48+5:302021-12-23T12:08:56+5:30

Sunny Leone new song madhuban controversy : . हे गाणं कनिका कपूरने गायलं आहे. सनी लिओनी आणि कनिका कपूर हे गाणं प्रमोट करण्यााठी काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस १५' मध्येही आल्या होत्या.

Sunny Leone new song madhuban stuck in controversy netizens demand to ban this song | Sunny Leone New song: 'मधुबन में राधिका नाचे' गाण्यात सनी लिओनीला पाहून भडकले यूजर्स, गाणं बॅन करण्याची मागणी

Sunny Leone New song: 'मधुबन में राधिका नाचे' गाण्यात सनी लिओनीला पाहून भडकले यूजर्स, गाणं बॅन करण्याची मागणी

googlenewsNext

सनी लिओनी (Sunny Leone) सध्या तिच्या नव्या गाण्यामुळे चर्चेत आहे. सनीचं 'मधुबन मे राधिका नाचे' (Sunny Leone Madhuban song) हे गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं कनिका कपूरने गायलं आहे. सनी लिओनी आणि कनिका कपूर हे गाणं प्रमोट करण्यााठी काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस १५' मध्येही आल्या होत्या.

आता हे गाणं वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. हे पाहिल्यावर काही यूजर्स नाराज झाले आहेत आणि त्यांनी हे गाणं यूट्यूबवरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. यूजर्सचं मत आहे की, या गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.

यूट्यूबवर यूजर्सनी 'मधुबन' गाण्यावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ आक्षेपार्ह आणि अश्लील असल्याचं सांगत हे गाणं लगेच यूट्यूबवरून काढण्याची मागणी केली आहे. एका यूजरने लिहिलं की, 'हिंदुंच्या धार्मिक भावना का दुखवत आहात?'. एकाने लिहिलं की, 'प्रॉडक्शन हाऊसमधील कुणीच कसं हे रोखलं नाही. प्रोड्युसरपासून ते दिग्दर्शकापर्यंत कुणालाही या गाण्याचे बोल का आहेत हे माहीत नाही का?.

सनी लिओनी आणि कनिका कपूरचं हे गाणं २२ डिसेंबरला रिलीज झालं होतं. सनी लिओनी डान्स करणार म्हटल्यावर तिचे फॅन्स या गाण्याची आतुरतेने वाट बघत होते. गाणं रिलीज होताच या गाण्याला १७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
 

Read in English

Web Title: Sunny Leone new song madhuban stuck in controversy netizens demand to ban this song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.