बॉलिवूडमधील इंटिमेट सीनच्या शूटिंग दरम्यानचा बेबी डॉल सनी लिओनीने केला खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 18:40 IST2020-09-15T18:34:20+5:302020-09-15T18:40:09+5:30
सनीने 'जिस्म २’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

बॉलिवूडमधील इंटिमेट सीनच्या शूटिंग दरम्यानचा बेबी डॉल सनी लिओनीने केला खळबळजनक खुलासा
बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात अभिनेत्री सनी लिओनी आपल्या फॅमिलीसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे. ती लॉस एंजेलिसमध्ये आपल्या मुलांसह आणि पती डेनियलसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करतेय. सोशल मीडियाच्या माध्यमातून सनी फॅन्सच्या संपर्कात असते. सनी पती आणि मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सनीचे चाहते ही तिच्या फोटो आणि व्हिडीओंवर लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून पसंती दर्शवत असतात.
लॉकडाऊन पूर्वी सनीने दिलेल्या एक मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ती बॉलिवूड चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्स शूट करते वेळी ती अन्कफर्टेबल असायची. सनी म्हणाली, बॉलिवूडमध्ये जेव्हा इंटिमेट सीन्स शूट केले जातात तेव्हा तुमच्या आजूबाजूला जवळपास 50 ते 100 लोक असतात. जे काही करत नाही फक्त चाह पित तुम्हाला एकटक बघत असतात.
पॉर्नस्टार ते लोकप्रिय अभिनेत्री
सनी लिओनी एक पॉर्नस्टार म्हणून तिच्या करियरला सुरुवात केली. 'जिस्म २’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. 'बिग बॉसच्या ५ व्या' सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच कार्यक्रमामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली आणि तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सनी रागिनी एमएमस 2 मध्ये दिसली होती. सनी 'वीरामादेवी' आणि 'कोका कोला'मध्ये दिसणार आहे.