‘लैला मै लैला’नंतर सनी लिओनी ‘या’ आयटम साँगमधून लावणार आग!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2017 08:41 AM2017-05-06T08:41:41+5:302017-05-06T14:11:41+5:30

शाहरूख खानसोबत ‘रईस’मध्ये ‘लैला मै लैला’ या आयटम नंबरवर धमाकेदार परफॉर्मेन्स करणारी सनी लिओनी आता पुन्हा एकदा असाच काहीसा ...

Sunny Leone 'item' from 'laila ma laila' will fire fire! | ‘लैला मै लैला’नंतर सनी लिओनी ‘या’ आयटम साँगमधून लावणार आग!

‘लैला मै लैला’नंतर सनी लिओनी ‘या’ आयटम साँगमधून लावणार आग!

googlenewsNext
हरूख खानसोबत ‘रईस’मध्ये ‘लैला मै लैला’ या आयटम नंबरवर धमाकेदार परफॉर्मेन्स करणारी सनी लिओनी आता पुन्हा एकदा असाच काहीसा कारनामा करण्यास सज्ज आहे. होय, ‘पीएसवी गरुडा वेगा’ या चित्रपटात सनी आपल्या ठुमक्यांनी आग लावणार आहे. चित्रपटात सनी एका आयटम साँगवर थिरकताना दिसणार असून, गाण्याच्या शूटिंगच्या सेटवरील काही फोटोज् सनीने तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत. गाण्यातील सनीचा अंदाज खूपच कातिलाना दिसत असून, ‘लैला मै लैला’ }}}} ">On sets of PSV Garuda Vega 126.18M!! #SunnyLeone#Dancepic.twitter.com/0KDYPgN5NN— Sunny Leone (@SunnyLeone) May 3, 2017इंटरनॅशनल बिझनेस टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सनीने या आयटम नंबरची शूटिंग पूर्ण केली आहे. सेटवरील काही फोटोज् सनीने काल शेअर केले असून, त्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. हे गाणे मुंबई फिल्म सिटी येथे चित्रित करण्यात आले आहे. गाण्यात सनीसोबत इतर ५० डान्सरही दिसणार आहेत. या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे प्रभूदेवाचा भाऊ विष्णुदेवा याने हे गाणे कोरियोग्राफ केले आहे. 

‘पीएवी गरुडा वेगा’ हा चित्रपट प्रवीण सत्तूरू यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून राजशेखर पुन्हा एकदा परतणार आहे. चित्रपटात राजशेखर एक पोलीस अधिकाºयाच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे. चित्रपटात पूजाकुमार, श्रद्धा दास आणि अदिथ अरुण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. }}}} ">Any guesses on what lyrics am I saying?? #PSVGarudaVega#SunnyLeonepic.twitter.com/N8chTyEn1t— Sunny Leone (@SunnyLeone) May 4, 2017सनी लिओनीविषयी बोलायचे झाल्यास सनीने रईसमध्ये केलेल्या ‘लैला मै लैला’ या आयटम साँगला आतापर्यंत १६५ मिलियन लोकांनी बघितले आहे. आता सनीच्या पुढच्या डान्सनंबरची झलक समोर आल्याने प्रेक्षकांना सनीचा जलवा बघण्याची आतुरता झाली नसेल तरच नवल. 

Web Title: Sunny Leone 'item' from 'laila ma laila' will fire fire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.