सनी लिओनीला न्यू ईअरचा झटका; ‘या’ सरकारने म्हटले, ‘तिला राज्यात येऊ देऊ नका’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 14:29 IST2017-12-16T08:59:48+5:302017-12-16T14:29:48+5:30

बंगळुरू येथे नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या सनी लिओनीच्या कार्यक्रमावरून निर्माण झालेला वाद मिटण्याचे चिन्ह दिसत नाही. कन्नड संघटनांनी ...

Sunny Leone to hit New Year; 'The government said,' Do not let her come to the state ' | सनी लिओनीला न्यू ईअरचा झटका; ‘या’ सरकारने म्हटले, ‘तिला राज्यात येऊ देऊ नका’

सनी लिओनीला न्यू ईअरचा झटका; ‘या’ सरकारने म्हटले, ‘तिला राज्यात येऊ देऊ नका’

गळुरू येथे नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या सनी लिओनीच्या कार्यक्रमावरून निर्माण झालेला वाद मिटण्याचे चिन्ह दिसत नाही. कन्नड संघटनांनी केलेल्या विरोधानंतर आता कर्नाटक सरकारनेच सनी लिओनीच्या कार्यक्रमावर बंदी घातली आहे. होय, सनी लिओनीच्या या कार्यक्रमाला सरकारने परवानगी नाकारताना नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला तिचा राज्यात कुठेही कार्यक्रम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कन्नड संघटनांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कर्नाटक रक्षा वेदिके आणि काही अन्य संघटना ३१ डिसेंबर रोजी होणाºया सनी लिओनीच्या प्रस्तावित कार्यक्रमाचा गेल्या काही दिवसांपासून तीव्र विरोध करीत आहेत. या संघटनांकडून आरोप करण्यात आला की, सनी लिओनीला राज्यात आमंत्रित करणे म्हणजेच आपल्या संस्कृतीवर हल्ला करणे होय. यासाठी गेल्या आठवडाभरापासून कर्नाटक रक्ष वेदिके (केआरवी) आणि अन् संघटनांचे सदस्य राज्यात तीव्र स्वरूपाची निदर्शने करीत आहेत. काही भागात तर मोर्चे काढून सनी लिओनीच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहनही केले आहे. वाढता विरोध लक्षात घेऊनच सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

कर्नाटक राज्याचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी सांगितले की, ‘मी अधिकाºयांना अशाप्रकारच्या कार्यक्रमाला परवानगी दिली जाऊ नये, असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. त्यामुळे तिला (सनी लिओनी) या राज्यात आण नये. लोक कार्यक्रमाचा विरोध करीत आहेत. त्यांना (आयोजकांना) कन्नड संस्कृती आणि साहित्याशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करायला हवे. दरम्यान, केआरवीचे पदाधिकारी हरीश यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की, ‘हा आमचा विजय आहे. सरकारने कार्यक्रम रद्द केला आहे.’

Web Title: Sunny Leone to hit New Year; 'The government said,' Do not let her come to the state '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.